देश-विदेश

साहेबांकडे गरीब-श्रीमंत हा भेदभाव नव्हता. एकदा जीव लावला की, ते पुर्ण जीव लावत. :-सुभाष पुरी, शिंगणापूर

साहेबांकडे गरीब-श्रीमंत हा भेदभाव नव्हता. एकदा जीव लावला की, ते पुर्ण जीव लावत. :-सुभाष पुरी, शिंगणापूर

 

घरची परिस्थिती हालाखीची. उपजिवीकेसाठी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यात काम करत असतांना एक दिवस माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांच्या कॅबीनला काम करण्याचा प्रसंग आला. कोल्हे साहेब कॅबिनला बसले बेल मारली त्याप्रमाणे आपण आत गेलो त्यावर त्यांनी कॅबिनचा एअरकंडीशन चालू करण्यांस सांगितले पण आपण गडबडुन गेलो. बाहेर दुसरा सहकारी बोलवावा म्हणून मी तेथुन चालु लागलो तेव्हढयात साहेब म्हणाले, अरे बाहेर कुठे चालला. त्यांनी पुन्हा बोलावले. व एसी आणि त्याची सिस्टीम समजुन सांगितली त्यांनी स्वतः हे बटण लावा, त्याची गार करण्याची क्षमता अमुक डिग्रीवर ठेवा असं सारं काही समजून सांगितलं. मनांत आधार वाटला. साहेब किती मोठे अन त्यांनी आपल्याला समजून सांगावा यातच मला त्यांचा अभिमान वाटला. एकदा साहेब भेटायला आले, घरात आल्यावर त्यांनी सगळी विचारपुस केली आणि माझे पाठीवर हात ठेवत सांगितलं, सुभाष काही लागलं तर सांग. शिर्डी संस्थानच्या रूग्णालयात वडील आजारी असतांना साहेब, धीर द्यायला समक्ष आले. डॉक्टरांना बोलावुन सांगितलं. हा माझा कर्मचारी आहे, त्याच्या वडीलांना लवकर बरं करा. हा क्षण देखील आपल्या आयूष्यातील सर्वात मोठा. साहेबांकडे गरीब-श्रीमंत हा भेदभाव नव्हता. एकदा जीव लावला की, ते पुर्ण जीव लावत.
सुभाष पुरी, शिंगणापूर. 
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे