कोपरगावात मुलीला त्रास देवुन,वडिलांना व भावाला मारहाण दोन जणांवर गुन्हे दाखल
कोपरगावात मुलीला त्रास देवुन,वडिलांना व भावाला मारहाण दोन जणांवर गुन्हे दाखल
कोपरगाव शहरामध्ये एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीला त्रास देऊन तिचा पाठलाग करून त्रास दिला याचा जाब विचारणार्या भावास व वडिलास मारहाण दोन जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.याबाबत अधिक माहिती अशी फिर्यादीने दिलेल्या फिर्यादित म्हटले की,मी रा. हनुमाननगर, कोपरगाव ता कोपरगाव जि अहमदनगर . मी के.जे.सौमय्या महाविद्यालय कोपरगाव येथे S.Y.B.COM मध्ये शिक्षण घेत आहे. आल्ताफ बुडान शेख, व अमन सय्यद हे दोघे मुले नेहमीमाझा पाठलाग करतात. परंतु माझे आई वडिल माझे कॉलेजला जाणे बंद करतील म्हणुन मी घरी सांगितले नव्हते. आज दिनांक 04/05/2023 रोजी 08.30 वा मी घरातुन कॉलेजला जाण्यासाठी निघाले होते. आल्ताफ बुडान शेख, व अमन सय्यद हे दोघे मोटार सायकलवर माझे पाठीमागे येत होते. अमन सय्यद हा मोटार सायकल चालवत होता व अल्ताफ हा पाठीमागे बसलेला होता. मी एस. जी. शाळेजवळील बोरावके चाळ समोरील रोडवरून जात असतांना, 08.45 वा. चे सुमारास वरील दोघांनी मोटार सायकलवरून माझेजवळ येवुन जोरात हॉर्न वाजुन मला कट मारला व पुढे निघुन गेले. त्याचवेळी माझा भाउ याने ते पाहील्याने तो त्यांचे पाठीमागुन पुढे जावून त्यांना लगेच थांबविले. त्यावेळी मी त्यांचेजवळ गेले तेव्हा माझ्या भावाने त्यांना विचारले की, तुम्ही माझे बहिनीचे मागे मागे येवुन जोरात हॉर्न वाजुन माझे बहिनीला कट का मारला असे विचारले असता, त्यांचे मधील अमन हा म्हणाला की, तुझी बहीन मला खुप आवडते त्यामुळे मी तिला होर्न मारला तुला काय करायचे ते कर, असे म्हणुन त्यांनी माझे भावाची गंवाडी धरून त्यास शिवीगाळ करत गचांडी धरुन मारहान केली तेव्हा मी सोडवा सोडवी करण्यासाठी गेली असतांना, अमन् सय्यद व अल्ताफ शेख यांनी तु आम्हांला खुप आवडतेस असे म्हणून अमन सय्यद याने माझे हाताला धरून ओढले. त्याचवेळी माझे भावाने त्यांना बाजुला ढकलले. दोघांनी आम्हांला शिवीगाळ करुन माझे भावाला जिवंत सोडणार नाही. अशी धमकी देवून त्यांचे मोटार सायकलवर निघुन गेले. भाउ याने मला कॉलेजला सोडले व त्याने घरी जावुन माझे वडिलांना झालेला प्रकार सांगितला. तेव्हा माझे वडिल कॉलेजवर येवून त्यांनी मला विचारले असता, मी त्यांना झालेला प्रकार सांगितला. त्यानंतर वडिल व भाऊ यांनी त्या मुलांकडे जावुन माझे मुलीला का छेडले बाबत विचारणा केली असता, त्यांनी माझे वडिलांना व भावाला लाथांनी व वीटांनी मारहान केली आहे.असे फिर्यादिने फिर्यादित म्हटले असुन यानुसार असुन भारतीय दंड संहिता १८६० 354-D,३२४,३२३,५०४,५०६,३४,अनुसूचीत जाती आणि अनुसूचीत जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, १९८९ नुसार 3(1) (w) (i),3(1) (r),3(1) (s) या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ताज्या बातम्यासाठी आमच्या व्हाटसाँप ग्रुपवर सहभागी व्हा,सहभागी होण्यासाठी खालिंल लिंक दाबा
https://chat.whatsapp.com/JywJRdA1v4oJ19TOQro9T2

