ब्रेकिंग

महापुरुषांच्या नावाचा फलक पाडणाऱ्यांवर कारवाईची मागणी

 

महापुरुषांच्या नावाचा फलक पाडणाऱ्यांवर कारवाईची मागणी

कोपरगाव, प्रतिनिधी : कोपरगाव शहरातील महात्मा गांधी प्रदर्शनी रोडलगत लोकशाहिर अण्णाभाऊ साठे पुतळ्यासमोर असलेला महापुरुषांच्या नावाचा फलक अज्ञात व्यक्तींनी जाणीवपूर्वक पाडल्याचा आरोप संदिप निरभवणे यांनी केला आहे या प्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी लोकशाहिर आण्णाभाऊ साठे मालवाहतूक चालक-मालक असोसिएशन, कोपरगाव यांच्या वतीने करण्यात आली आहे.

याबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले असून, फलक पाडण्यामागील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.निवेदनात म्हटले आहे की,लोकशाहिर आण्णाभाऊ साठे मालवाहतूक चालक-मालक असोसिएशनच्या वतीने सन 2018 पासून संबंधित फलक उभारण्यात आला होता. हा फलक कोणालाही किंवा वाहतुकीला अडथळा निर्माण करत नव्हता. असे असतानाही अज्ञात व्यक्तींनी तो जाणीवपूर्वक पाडल्याचा आरोप करण्यात आला आहे.
महापुरुषांच्या नावाचा फलक पाडल्याने त्यांच्या कार्याचा व विचारांचा अवमान झाल्याची भावना समाजातील नागरिकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे या घटनेची सखोल चौकशी करून दोषींना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
दरम्यान, या घटनेमुळे परिसरात नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलीस प्रशासनाने तातडीने तपास करून सत्य समोर आणावे, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.या निवेदनावर संदिप निरभवणे सचिन त्रिभुवण स्वप्निल पवार दिलीप म्हस्के संदीप मरसाळे नितिन शेलार संदीप पारधी साई लांडगे,गोकुळ विघवे,रवींद्र विघवे, जतिन निरभवणे शरद निरभवणे अंबादास शेलार यांच्या सह्या आहेत

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे