गुन्हेगारी

शिवीगाळ करुन चाकूने मारहाण ६ जणांवर कोपरगाव तालुका पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल

शिवीगाळ करुन चाकूने मारहाण ६ जणांवर कोपरगाव तालुका पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल

 

सदरचे सविस्तर वृत्त असे की, “फिर्यादी इसम हे सुरेगाव येथील रहिवासी आहे. त्यांचे सासू आणि सासरे त्याच गावात आहेत दिनांक 17/06/2025 रोजी दुपारी 02:30 वाचे सुमारास फिर्यादी महेश निकम  घरी असताना फिर्यादीचे  साडु व मेव्हणे यांचे  सासु सासरे यांचेशी वादावादी चालु होती म्हणुन फिर्यादीची पत्नी उज्वला महेश निकम ही त्यांना समजावुन सांगण्यासाठी गेली असता फिर्यादी महेश निकम यांचा साडु राहुल विजय गायकवाड व त्याचा भाऊ रोहीत विजय गायकवाड यांनी तिला शिवीगाळ करू लागले ते पत्नी उज्वला हिंस शिवीगाळ करत होते म्हणुन फिर्यादी महेश निकम तेथे गेले व त्यांना आपसात वाद नका करू सोडुन द्या असे म्हणाले यावर राहुल विजय गायकवाड याने फिर्यादीस  शिवी दिली मग फिर्याद  म्हणाले की   मला शिवीगाळ करयाचे काय कारण तुम्ही मला का शिवीगाळ करता असे विचारपुस केली असता त्यांचे घरातील. रोहीत विजय गायकवाड  राहुल विजय गायकवाड  कविता राहुल गायकवाड  आम्रपाली रोहीत गायकवाड  मनोज मार्कस गायकवाड माया मनोज गायकवाड असे सर्व जण एकत्रित जमुन आले त्यावेळी राहून विजय गायकवाड याचे हातात चाकु होता, रोहीत गायकवाड याचे हातात लोखंडी रॉड होता त्यांनी काही एक ऐकता फिर्यादीस रोहीत याने लोखंडी रॉडने डोक्यावर व राहुल याने हातावर चाकुन मारहाण केली फिर्यादीच्या  पत्नी हीस कविता राहुल गायकवाड, आम्रपाली रोहीत गायकवाड, माया मनोज गायकवाड यांनी शिवीगाळ करून  लाथाबुक्यांनी मारहाण केली तसेच मनोज मार्कस गायकवाड यांनी सुद्धा आम्हाला शिवीगाळ केली व ते तेथुन निघुन गेले माझे डोक्यात व हातावर मार लागल्याने व रक्त येवु लागल्याने आम्ही तेथुन पोलीस स्टेशनला आलो व प्रथम उपचार करून तक्रार देण्यासाठी आलो आहे.अशी तक्रारीत म्हटले आहे

जाहिरात

या प्रकरणी फिर्यादी यांनी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रं. १८२/२०२५ भारतीय न्याय संहिता सन-२०२३चे कलम ११८(१), ११५(२), ३५२,३५१, (२), (३),१८९, (२),१९१(३),१९० प्रमाणे वरील आरोपी विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप कोळी, पोलिस हे.कॉ.एम.बी. दहिफळे आदींनी भेट दिली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हे. कॉ. दहिफळे हे करीत आहेत

जाहिरात

 

संपादक रवींद्र जगताप

सत्य एक्सप्रेस न्युजच्या व्हाँटसाँप ग्रुपवर सहभागी होण्यासाठी खालिल लिंक दाबा

https://chat.whatsapp.com/JbzONlETFfd5dY2t6kOUm6

पोलिस अधिकारी सांगुन तो नागरिकांना लुटायचा सविस्तर बातमीसाठी खालिल लिंक दाबा

https://youtu.be/K9XClXuj8Dw?si=tJA1YLL4TkxtkerI

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे