कोपरगाव – नगर -मनमाड हायवे जवळ चोरट्यांनी दमबाजी करत ट्रॅक्टर केला लंपास :तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
कोपरगाव(प्रतिनिधी):- चार अज्ञात चोरट्यांनी कोपरगाव हद्दीतील नगर मनमाड हायवे जवळ येसगाव येथे एका ट्रॅक्टर चालकास दमदाटी करून बळजबरीने त्याच्या ताब्यातील मोबाईल फोन व ट्रॅक्टर असा एकूण ५ लाख ५१ हजाराचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना दि.११ फेब्रुवारी रोजी कोपरगाव येथील नगर मनमाड हायवे जवळ येसगाव जवळ सायंकाळच्या सुमारास घडली असून त्याबाबद कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात चार अज्ञात चोरट्यान विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सविस्तर वृत्त असे की, दि.११ फेब्रुवारी रोजी सुमारे साय. ५ वाजेच्या सुमारास फिर्यादी हे कोपरगाव हुन गवंडगाव ता.येवला येथे सोलीस कंपनीचा ट्रँक्टर जुगाड सह उस आणण्यासाठी जात असतांना पांढर्या रंगाच्या बोलेरो गाडीतील चार अनोळखी चोरट्यांनी त्यांचे ट्रँक्टरला बोलेरो गाडी आडवि लावुन दमदाटी करुन फिर्यादीचे ताब्यातील ट्रँक्टर ५,५०,०००/-रुपये किंमतीचा लाल रंगाचा सोलीस कंपनीचा ट्रँक्टर त्याचा चेसी न.3102FLU04H947533F19 व ईंजीन नं. JXRSH952052S3 असा असलेला व हिरव्या रंगाचा जुगाड नं.319 व रुपये १०००/- किंमतीचा काळ्या रंगाचा जीओ कंपनीचा मोबाईल फोन असा एकूण ५,५१,००/- रुपये किंमतीचा ऐवज बळजबरीने चोरुन नेला असल्याची फिर्यात बाबासाहेब सीताराम आहेर वय – ४९ धंदा ड्रायव्हर (रा. रस्ते सुरेगाव ता. येवला) यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दिली असून त्यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा रजि.नं ४५/२०२२ भादवि कलम ३९२,३४१,३४ प्रमाणे कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सुरेश आव्हाड हे करत आहे
