समृद्धी महामार्गावर दरोडा फसल्याने आरोपींची फिर्यादीस मारहाण , आरोपी फरार लाखोंचा माल जप्त
समृद्धी महामार्गावर दरोडा फसल्याने आरोपींची फिर्यादीस मारहाण , आरोपी फरार लाखोंचा माल जप्त
संपादक:- रविंद्र जगताप
कोपरगाव : दि. 13 फेब्रुवारी रोजी तालुक्यातील मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गावर रात्री 1वाजण्याचे सुमारास देर्डे चांदवड शिवारात फिर्यादी प्रविण भरत निंबाळकर हे मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गावर पेट्रोलींग करीत असतांनाच तवेरा गाडी नं.एम. एच. 17क्यू. 1341ह्या संशयास्पद रित्या फिरणाऱ्या गाडीतील व्यक्तींकडे विचारपूस करीत असता़ना त्यांना आपल्या दरोड्याचा प्रयत्न फसल्याने चिडलेल्या आरोपींनी जिवघेण्या मारहाणीत निंबाळकर यांना गाडीत कोंबून प्राणघातक मारहाण सुरू केली व त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली.


यावेळी आरोपींनी तुम्ही आमचा दरोड्याचा प्रयत्न फसवल्याने तुला आम्ही सोडणार नाही अशी धमकी देऊन आरोपी मारहाण करीत असतांनाच झालेल्या प्रखर विरोधाने व पोलिसांचे चाहुलीने तीन ते पाच नंबर चे संशयित आरोपी पळून गेले. या घटनेचे वृत्त समजताच घटनास्थळी आल्यावर पोलीसांनी घटना स्थळावरून तीन लाख रुपयांची तवेरा गाडी, सहा हजार रुपये किमतीचे जिओ व ओप्पो कंपनीचे दोन मोबाईल , दरोड्याच्या उद्देशाने आणलेला चाकू , लोखंडी रॉड , एक लोखंडी पाईप , एक लोखंडी कटावणी ,या हत्यारांसह एक रस्सी ,आदी स्वरूपात लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
फिर्यादीने दाखल केलेल्या फिर्यादी नुसार 1] अन्सार आलम शैख रा. इस्लाम वाडी , चांदेकसारे ता. कोपरगाव [ 2 ] अमोल भाऊसाहेब होन ,रा. झगडे फाटा ता . कोपरगाव यांना पोलिसांनी संंशयित म्हणून ताब्यात घेतले तर [ 3 ] सोनू शिंदे [4] संदिप दहे ,[ 5 ] शेंडी यांचे पूर्ण नाव माहीत नाही रा. डाऊच बुद्रुक ता. कोपरगाव हे पोलिसांना हुलकावणी देऊन पसार झाले यां संशयिता विरोधात गुन्हा
रजि.नं. 87/2023 भा.द.वि.कलम 399,307,364,323,504,506अन्वये पो.है.कॉं. /639म्हस्के , यांनी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक दौलत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सहाय्यक निरीक्षक सुरेश आव्हाड व त्यांचे सहकारी करीत आहेत
सत्य एक्सप्रेस न्युजच्या व्हाटसाँप ग्रुपवर सहभागी होण्यासाठी खालिल लिंक दाबा
https://chat.whatsapp.com/KgmXrffhj0F6D04zF6eSoo

