ब्रेकिंग

वादळाने नागरिकांचे नुकसान, नुकसानीचे पंचनामे करा आ. विवेकभैय्या कोल्हे यांची तहसीलदारांना सूचना

वादळाने नागरिकांचे नुकसान, नुकसानीचे पंचनामे करा आ. विवेकभैय्या कोल्हे यांची तहसीलदारांना सूचना

कोपरगाव तालुक्यात विविध ठिकाणी आलेल्या वादळामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी घरांवरील पत्रे उडून, ग्रीन हाऊस,कांद्याच्या चाळीचे छत, पॉली हाऊस उडून गेले असून नुकसान झाले आहे. तसेच मोठमोठी झाडे उन्मळून पडल्याने मालमत्तेचे व शेतीचेही नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार विवेकभैय्या कोल्हे यांनी तहसीलदार महेश सावंत यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून नुकसानीची सविस्तर माहिती घेतली.

यावेळी आमदार कोल्हे यांनी प्रशासनाने तातडीने सर्व प्रभावित भागांचा आढावा घेऊन नुकसानीची नोंद घेण्याचे निर्देश दिले व पंचनामे करा अशा सूचना दिल्या आहे.वादळामुळे बाधित झालेल्या नागरिकांना शासन स्तरावर मदत मिळावी, यासाठी प्रयत्न करण्यात यावे अशीही चर्चा केली आहे.

तसेच गावागावांतील नुकसानीची माहिती संकलित करून प्रभावित कुटुंबांना दिलासा देण्यासाठी आवश्यक ती सर्व कार्यवाही तात्काळ करण्यात यावी, असेही त्यांनी नमूद केले. वादळामुळे अनेक नागरिकांचे आर्थिक नुकसान झाले असून अशा परिस्थितीत प्रशासनाने संवेदनशीलता दाखवत मदतकार्याला प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.दरम्यान, तालुक्यातील नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाशी संपर्क साधून नुकसानीची माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे