महाराष्ट्र

शेतकरी संघटनेने उभारलेल्या आकारिक पडीत लढ्यास न्याय देणे माझे दायित्व- खासदार लोखंडे उपोषणाचा तिसरा दिवस-तोडगा नाहीच

शेतकरी संघटनेने उभारलेल्या आकारिक पडीत लढ्यास न्याय देणे माझे दायित्व- खासदार लोखंडे

उपोषणाचा तिसरा दिवस-तोडगा नाहीच

 

श्रीरामपूर माळवाडगाव प्रतिनिधी:-गेल्या तीन दिवसापासून श्रीरामपूर तालुक्यातील नऊ गावचा अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला अकारि पडीत प्रश्न शेतकरी संघटनेच्या माध्यमातून एडवोकेट अजित काळे यांच्या नेतृत्वाखाली ऐरणीवर आला आहे. अॅड अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याबाबत जनहित याचिका दाखल करून तीन वर्षे झाली आहेत ती लाभधारक शेतकर्यासाठी विनामुल्य लढत आहे . न्यायालयाने राज्य सरकारला सदर प्रश्नी निर्णय घेण्यास सांगितले असून त्यास एक वर्षाचा कालावधी झाला. परंतु शासनाने याबाबत कुठलाही निर्णय न घेतल्याने अकारी पडीत शेतकऱ्यांनी १२/३ /२०२४ पासून उपोषणाचा मार्ग अवलंब दिला आहे. त्यास तीन दिवस उलटून गेले आहे तरी महाराष्ट्र शासनाकडून संवेदनशील असलेल्या प्रश्नाकडे सोयीस्कर रित्या दुर्लक्षित केल्या जात आहे. सदर बाब ही गंभीर आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर हक्कासाठी शेतकऱ्यांना सात दशकाचा कालावधी उलटूनही न्याय मिळाला नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी अॅड अजितदादा काळे साहेब यांच्या माध्यमातून न्यायालयात दाद मागितली .उपोषण करते शालनताई झुरळे ,बाळासाहेब आसने ,अॅड सर्जेराव घोडे ,शरद आसने ,सोपान नाईक सर बबनराव वेताळ, सुनिल आसने यांनी अन्नाचा कणही न घेता गेल्या दोन-तीन दिवसापासून बेमूदत उपोषण करण्याचे ठरविले आहे .संघर्ष समितीच्या वतीने दररोज या उपोषणात दोन उपोषणार्थी आंदोलक भाग घेणार असून जोपर्यंत शासन ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत दररोज उपोषणकरत्या आकारि पिडित शेतकऱ्यांची संख्या वाढणार आहे .याची सर्व जबाबदारी शासनावर असणार आहे .या उपोषणासाठी तालुक्यातील  खासदार सदाशिव लोखंडे माजी आमदार भानुदास मुरकुटे, काँग्रेसचे करण ससाने, श्रीरामपूर तालुक्याचे आमदार लहू कानडे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, काँग्रेसचे अरुण पाटील नाईक, सचिन गुजर, अशोक कानडे ,ज्ञानेश्वर मुरकुटे , भाजप ओबीसी सेलचे प्रकाशअण्णा चित्ते ,वसंतराव मुठे , बाळासाहेब नाईकसह बाळासाहेब केशव आदीक ,बापुसाहेब आदिक यांनी आंदोलनास पाठिंबा देऊन सहभाग नोंदविला आहे त्यांचे आकारि पडीत संघर्ष समितीचे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे, श्रीरामपूर तालुका अध्यक्ष युवराज जगताप, राहुरी तालुका अध्यक्ष नारायण टेकाळे, शेतकरी संघटनेचे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ प्रमुख प्रभाकर कांबळे शरद आसने,डॉ दादासाहेब आदिक , डॉ विकास नवले, सुदामराव औताडे, साहेबराव चोरमल, अॅड प्रशांत कापसे, भागवत बकाल, बबनराव उघडे, आदींनी आभार व्यक्त केले.

यावेळी खासदार सदाशिव लोखंडे म्हणाले की, जोपर्यंत आकारिपडितांचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत मी या प्रश्नासोबत असून मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे यांच्याशी बोलून याबाबत लवकरच मार्ग काढून त्यांच्यासोबत मिटिंग लावणे बाबत आश्वासित केले.
आंदोलनात आज तिसऱ्या दिवशीही शेकडो आकारि पडित शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला श्रीरामपूर तहसील कचेरी समोर त्यामुळे वेगळेच चित्र पाहावयास मिळत होते. त्यामध्ये प्रामुख्याने प्रल्हाद वेताळ, अप्पासाहेब टेकाळे, तुकाराम मुठे, विजय ताके, दादासाहेब खर्डे संपतराव मुठे ,भास्कर शिंदे, लक्ष्मण चिडे, रावसाहेब आढाव ,अण्णासाहेब आसने ,नानासाहेब पांडु आसने रावसाहेब कासार ,शिवाजी पवार, दीपक बोलके, सागर मुठे ,प्रकाश ताके , मंगला बनसोडे ,वर्षा आसने राजश्री कुलकर्णी, मीनाक्षी कुलकर्णी संगीता अनुसे, कविता आसने, कांताबाई आसने,कावेरी आसने ,भरत आसने, अण्णासाहेब वेताळ ,सुरेश ताके जितेंद्र भोसले, गणेश ठाणगे दिलीप गलांडे, अशोक दुधेडिया दत्तात्रेय मुठे, भाऊसाहेब आढाव संदीप गवारे, अण्णासाहेब चांदगुडे आदी शेकडो आकारी पडीक धारकांनी या आंदोलनात तिसऱ्या दिवशीही तितकाच उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे