महाराष्ट्र

“गोदावरी नदीचे आतडे तोडू नका – अँड.नितीन पोळ

“गोदावरी नदीचे आतडे तोडू नका – अँड.नितीन पोळ

जल,जमीन आणि जंगल ही सर्व सामान्य भाषेत तुमच्या आमच्या जगण्याचे महत्वाचे दीप स्तंभ आहेत आणि या साऱ्यांचे संरक्षण,संगोपन करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांचीच आहे आज जगातील पर्यावरण दिन आहे या निमीत्ताने सर्वांना हार्दीक शुभेच्छा मात्र या शुभेच्छा देत असताना आपण या सर्वांचे किती संरक्षण आणि संगोपन करतो हे विशेष महत्वाचे कारण मानवी जीवनात या साऱ्यांचे अनन्य साधारण महत्व असून हया सर्वांमध्ये असलेल्या जीव सृष्टीवर एकमेकांचे जीवन अवलंबून असते कोपरगाव तालुका तालुक्यात जंगलांचे प्रमाण तशा अर्थाने कमीच आहे मात्र जल अर्थात पाण्याचे प्रमाण देखील कमी होते व आहे खरं तर कोपरगाव तालुका अवर्षण प्रवण म्हणजे कमी पर्जन्य मान असलेला तालुका मात्र या तालुक्यातून दक्षिणेची गंगा म्हणून ओळखली जाणारी गोदावरी नदी जाते आणि ही गोदावरी नदी खऱ्या अर्थाने कोपरगाव तालुक्याची जीवन वाहिनी आहे साधारण पन्नास साठ वर्षापूर्वी गोदावरी नदी बारमाही वाहायची त्यामुळे गोदावरी काठी असलेली गावे सुजलाम सुफलाम होती याच नदीवर नाशिक जिल्ह्यात अनेक धरणे झाली वाढती लोकसंख्या, वाढते औद्योगिकरण आणि कमी होणारे पर्जन्यमान यामुळे कधी काळी बारमाही वाहणारी गोदावरी नदी अटायला लागली आणि कोरडी पडली अतिशय पौराणिक वारसा लाभलेल्या या गोदावरी नदीवर अनेक धार्मिक स्थळे असून त्याना ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालेले आहे अशा प्रकारे ऐतिहासिक पौराणिक वारसा व कधी काळी बारमाही वाहणारी तालुक्यातील शेती फुलवणारी गोदावरी नदी आज वेगळ्याच कारणाने प्रकाश झोतात आली आणि ते म्हणजे गोदावरी नदीतून होणारा प्रचंड वाळू उपसा…गोदावरी नदीच्या पात्रात मंजूर, हंडेवाडी,मायगाव देवी,कुंभारी,सोनारी चांदगव्हान या गावाच्या शिवारात या नदीवर वाळू येऊन साचते आणि याच वाळूच्या ढिगाऱ्याखाली महसूल विभागाच्या यंत्रणेची वक्र दृष्टी पडली आणि या भागात वाळूचे लिलाव झाले मात्र महसूल विभागाने दिलेल्या ठेक्या वितिरिक्त तालुक्यातील अनेक बेरोजगार युवक आज वाळू धंद्यात उतरले असून महागडी जेसीबी, पोकलँड,डंपर, ट्रॅक्टर यांच्या माध्यमातून रोज शेकडो गाड्या भरून वाळू उपसा होत आहे यातून नाही म्हणायला तालुक्यातील युवकांना थोड्याफार प्रमाणात रोजगार मिळाला असला तरी हजारो लाखो रुपयांची उलाढाल होत असताना अनेक वाईट प्रसंगांना तोंड फुटत असून वाढती गुन्हेगारी समोर येत आहे महसूल आणि पोलीस खात्याच्या आशीर्वादाने ही लूट सुरू असून  तालुक्यातील प्रस्तापित नेते यांनी देखील या वाळू उपसा करण्यात त्यांचे बगल बच्चे सर्वात पुढे आहे आज फक्त डोळ्यांना हा वाळू उपसा दिसत असला तरी अनेक ठिकाणी नदी पंचवीस ते पन्नास फूट खोल झाली आहे त्यातून रोज हजारो गाड्या वाळू उपसा सुरू आहे नदीची आजची परिस्थिती म्हणजे एखाद्या निर्जीव जीवावर रोज अत्याचार होत असून अक्षरशः नदीचे आतडे जणू ओरबाडून काढले जात आहे आज निव्वळ वाळू उपसा होत असला तरी या बरोबरच नदीकाठच्या विहिरी कोरड्या ठाक पडल्या आहेत त्याच प्रमाणे रोजच्या वाळू उपसा मुळे खाली खडक उघडे पडले असून भविष्यात नदीतून वाहून जाणारे पाणी निघून जाईल त्यामुळे भविष्यात त्याचे दूरगामी परिणाम तालुक्यातील सर्वच जनतेला भोगावे लागतील शासनाला महसूल मिळवायचाच असेल तर निव्वळ वाळू हा पर्याय नाही तर या नदी काठी अनेक पौराणिक मंदिरे आहेत या नदीवर पाणी अडवून या पौराणिक मंदिरांना निधी देऊन शासनाला मोठा महसूल मिळू शकतो व नदी काठी असलेला परिसर सुजलाम सुफलाम करता येऊन तालुक्यातील शेती व पाण्याचा प्रश्न मिटवता येऊ शकतो त्यासाठी वेळीच कृती आराखडा तयार करणे आवश्यक आहे अन्यथा पर्यावरणाचा असाच ऱ्हास होत राहिल्यास खूप मोठ्या संकटांना सामोरे जावे लागेल आणि हे भविष्य सांगायला कोण्या जोतिष्याची आवश्यकता नाही मात्र हे टाळायचे असेल तर तालुक्यातील लोक प्रतिनिधी,सेवा भावी  संस्था व नागरिकांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे हीच या पर्यावरण दिनी अपेक्षा करतो चला तर गोदावरी नदीचे लचके तोडणे व आतडे बाहेर पडणे थांबवू या 

 

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे