मणिपूर घटनेच्या निषेर्धात बहुजन आघाडीचे तहसीलदार यांना निवेदन तर कोपरगाव शहरातील डाँ.बाबासाहेब आंबेडकर मैदानाच्या नावाच्या फलक कोणी काढला, चोरीला गेला का? शोध घेवुन चोरट्यावर गुन्हा दाखल करावा:- वंचित बहुजन आघाडी
संपादक:- रविंद्र जगताप
कोपरगाव प्रतिनिधी:-मणिपूर राज्यात मैतेइ व कुकी या दोन समुदायात उसळलेल्या हिंसाचारातून दोन कुकी आदिवासी महिलांची नग्न धिंड काढून त्याच्यावर अमानुष अत्याचार करण्यात आला व त्यांचे नातेवाईक यांचा खून करण्यात आला. सदर घटना अत्यंत क्रुर व अमानवीय आहे याघटनेचा निषेध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतिने कोपरगाव तहसीलदार यांना निवदेन देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, मणिपूर राज्यात दोन समुदायात प्रचंड मोठ्या वाद होवून दंगल झाली असून या मध्ये अनेकांनी आपले प्राण गमविले आहे. यात मानवतेला काळीमा फासणारी घटना घटली असून यात दोन आदिवासी महिलांची नग्न धिंड काढून त्यांच्यावर सामुहिक बलात्कार करण्यात ‘आला त्याच बरोबर त्यांचे वडील भाऊ यांची हत्या केली. त्या आरोपींना कठोर शासन करून त्यांना फाशी दयावी. त्याच बरोबर अनेक दिवसापासून मणिपूर राज्यात कायदा व्यवस्था धोक्यात असली असून येथील शासनास कायदा व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी अपयश आले असून येथे राष्ट्रपती राजवट लागू करावी.अशी मागणी करण्यात आली आहे तसेच कोपरगांव शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानातील दत्त मंदिराजवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानाचा फलक होता. तो फलक यापूर्वी काढण्यात आला होता. तो फलक पुन्हा बसवावा हि मागणी केली होती. हा फलक पुन्हा बसविला आता सध्या पुन्हा हा फलक काढला की चोरीला गेला. याचा शोध घ्यावा. आणि चोरीला गेला असेल तर त्या चोरटयांवर गुन्हा दाखल करावा. असे निवेदनात म्हटले आहे, याप्रसंगी शरद खरात उत्तर महाराष्ट्र संघटक, नितीन बनसोडे कोपरगाव तालुकाध्यक्ष, गौतम बनसोडे तालुका महासचिव ,गोरख चोपदार तालुका सचिव, शकील तांबोळी युवा शहराध्यक्ष, शुभम शिंदे युवा शहराध्यक्ष, अनिल बनसोडे, राजेंद्र पगारे, सुरज हुसळे ,मुकेश शिंदे ,महेंद्र सांगळे, रंजनी लासे कैलास कुराडे विकास देशमुख अनिल कांबळे, विनोद नेरे, के एस मोकळ ,मयूर शिंगाडे संजय त्रिभुवन, शिवाजी त्रिभुवन, भीमराज बनसोडे ,आकाश डोखे गणेश सोनवणे ,रतन भारती ,मुंन्तोडे एच.डी, मोकळ राजेंद्र, शरद जाधव आदी कार्यकर्त्यांच्या या निवेदनावर सह्या आहेत




