देश-विदेश

दारिद्रय रेषेखालील कर्ज प्रकरण देण्याबाबत लाभार्थ्यांची बॅकाकडुन अडवणुक:-सामाजिक कार्यकर्ते किशोर चोरगे

दारिद्रय रेषेखालील कर्ज प्रकरण देण्याबाबत लाभार्थ्यांची बॅकाकडुन अडवणुक:-सामाजिक कार्यकर्ते किशोर चोरगे

दारिद्रय रेषेखालील कुटुंबांसाठी उद्योग व्यवसायाला चालना देण्या करता दिले जाणारे रूपये २ लक्ष कर्ज हे बॅकाकडुन विना अडवणुक दिले जाण्या बाबत सामाजिक कार्यकर्ते किशोर चोरगे यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जिल्हाधिकारी कोपरगावचे आमदार माझी आमदार लिड बॅक तहसिल कोपरगांव यांना निवेदन दिले आहे निवेदनात पुढे म्हंटले आहे कि मानवी जीवनाच्या गरजा न भागवता येण्याची परिस्थिती म्हणजे दारिद्र्य असे म्हणता येईल.
मानवी गरजा या सतत वाढणाऱ्या व अमर्यादित असतात. मात्र काही गरजा या मानवी जीवनासाठी आवश्यक ठरतात. त्या मूलभूत गरजा शिवाय मानवी जीवन अशक्य ठरते. अशा मूलभूत गरजांची पूर्तता होणे आवश्यक असते. अशा मानवी मूलभूत व अत्यावश्यक गरजा भागवणे देखील या लोक समूहाला अशक्य ठरते. अशा लोकांसाठी शासन दारिद्र्य या संकल्पने अंतर्गत अनेक योजना राबवुन या दारीद्र रेषेतील लोकांचे जीवन सुखकर करण्याचा व त्यांच्या गरजा भागवून त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्न केला जातो
दारिद्रय रेषेखालील कुटुंबांसाठी उद्योग व्यवसायाला चालना देण्या करता रूपये २ लक्ष कर्ज हे बॅकाकडुन दिलं या योजनेचं नाव पंडित दिनदयाळ अंत्योदय योजना होय
पण ग्राम पंचायत किंवा नगरपालिका मधुन बॅकांना काही नावं सुचवुन त्या लोकांना उद्योग सुरू करण्यासाठी कर्ज दिले जाते पण आज परिस्थिती पाहता शासनाच्या या योजनेला बॅका केराची टोपली दाखवता
बॅकेत प्रकरण वर्ग झाल्यावर अनेक दारिद्रय रेषेखालील लोक बॅकेत जाता पण बॅक मॅनेजर त्यास उडवा उडवीचे उत्तर देऊन पळवण्याचा प्रयत्न करता आणि दारिद्रय रेषेखालील कुटुंबांना न्याय मिळत नाही व मानवी जीवनाच्या गरजा न भागवता येण्याची परिस्थिती म्हणजे दारिद्र्य असे म्हणता येईल. त्यांची परिस्थिती कायम तशीच राहते आणि त्यांचे जीवनमान कधीच वर येत नाही या बाबींकडे लोकप्रतिनिधी किंवा संबंधित प्रशासन कधीच लक्ष देत नाही
शासन योजना राबवत पण त्या योजनेचा लाभ लाभार्थ्यांना मिळतो का नाही हे कोणी पाहतच नाही आणि शासनाच्या योजना कागदावरच खितपत कुजुन जातात हि मोठी शोकांतिका आहे याकडे प्रशासनाने लक्ष देत गरजुंना खुप त्रास न देता व शासकिय योजनेचा लाभ मिळाला पाहिजे या योजनेचा कर्जलाभ हा फक्त शासकिय बॅका मधुनच मिळतो पण स्थानिक शासकिय बॅका  सर्वच शासकिय बॅका या योजना गरजुंना मिळवुन देण्यापेक्षा गरजुंची पिळवणूक करता कागदपत्रांच्या नावाखाली वेळ वाया घालुन कर्ज नामंजुर करता हि द्रारीद्र रेषेतील कुटुंबांना सतत दारिद्रय रेषेत अडकुन पाडण्याचा शासन पुरस्कृत डाव आहे की काय अशी शंका उपेक्षित वंचित पिढीत लोकांना येते यावर शासनाने काही मार्ग सुखकर करून लवकर कर्ज मिळवुन देण्याचा प्रयत्न झाला पाहिजे व बॅकाकडुन दारिद्रय रेषेखालील कुटुंबांसाठी उद्योग व्यवसायाला चालना देण्या करता दिले जाणारे रूपये २ लक्ष कर्जसाठी जी बॅकाकडुन अडवणुक केली जाते ती अडवणुक बॅकाकडुन बंद करण्यात यावी आणि लाभार्थींना विना अट शासकिय नियमात कर्ज त्वरीत वाटप करण्यात यावे असे निवेदन जयहिंद विचार मंच संस्थापक अध्यक्ष किशोर चोरगे यांनी पाठवले आहे निवेदनावर जयहिंदचे उपाध्यक्ष दिलीप घुमरे अल्ताफभाई शहा शब्बीरभाई शेख विनोद वाकळे यांच्या सह्या आहे

ताज्या बातम्यासाठी आमच्या व्हाटसाँप ग्रुपवर
 सहभागी व्हा,सहभागी होण्यासाठी खालिंल
 लिंक दाबा

https://chat.whatsapp.com/JywJRdA1v4oJ19TOQro9T2
जाहिरात
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे