महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समाजाला दिशादर्शक -स्नेहलताताई कोल्हे
संपादक:-रविंद्र जगताप
कोपरगाव : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक समता व परिवर्तनासाठी आयुष्यभर संघर्ष केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी होते. ते महान अर्थतज्ज्ञ, आंतरराष्ट्रीय किर्तीचे कायदेतज्ज्ञ, अभ्यासू व कुशल राजकारणी होते. आज भारत देश ज्या वेगाने प्रगतीकडे वाटचाल करतोय त्यामागे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाने घालून दिलेल्या नीतीमूल्यांचा मोठा वाटा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी त्यांच्या कार्याचे स्मरण करून त्यांचे विचार आचरणात आणण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन भाजपच्या प्रदेश सचिव तथा माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतनिमित्त कोपरगाव शहरातील धारणगाव रोडवरील संजयनगर येथील भीम सरकार ग्रुप, राजगड, माधवबाग, एस. टी. बसस्थानक, संविधान चौक फाऊंडेशन, टिळकनगर, हनुमाननगर, टाकळी नाका मित्रमंडळ आदी ठिकाणी आयोजित कार्यक्रमात स्नेहलताताई कोल्हे यांनी तथागत गौतम बुद्ध व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले.



यावेळी स्नेहलताताई कोल्हे म्हणाल्या, महामानव बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ भारताचे नव्हे तर संपूर्ण जगाचे भूषण आहेत. आधुनिक भारताच्या उभारणीत त्यांचे योगदान कधीही विसरता येणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी माणुसकी जपा, मानवता धर्म जपा, अशी शिकवण दिली आहे. त्यांच्या विचारावरच आज आपला देश प्रगतीच्या दिशेने यशस्वी वाटचाल करत आहे. माजी मंत्री सहकारमहर्षी स्व. शंकरराव कोल्हे साहेबांनी सामाजिक एकता कायम राहण्यासाठी सदोदित प्रयत्न केले. सामाजिक ऐक्य अबाधित ठेवून सर्व जाती-धर्मातील लोकांना सोबत घेऊन समाजकारण केले. समाजातील दीन-दलित, उपेक्षित व वंचित लोकांच्या न्याय्य हक्कांसाठी आयुष्यभर लढा दिला. स्व. कोल्हेसाहेबांचा हाच विचार पुढे नेण्याचे काम कोल्हे परिवार आजही करत आहे. आपण आमदार असताना कोपरगावात नवीन सुसज्ज बसस्थानक उभारले. बसस्थानक परिसरात कायम स्वच्छता ठेवून प्रवाशांना दर्जेदार सुविधा दिल्या पाहिजेत. बसस्थानक परिसरात नव्याने वृक्षलागवड करून सुशोभिकरण करावे. कोपरगाव आगारात आवश्यकतेनुसार कर्मचारी व इतर सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपला शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती कोल्हे यांनी दिली.बसस्थानकावर झालेल्या कार्यक्रमात वरिष्ठ लिपिक मिलिंद कोरपे यांची बढतीवर अकोले आगारात बदली झाल्याबद्दल स्नेहलताताई कोल्हे यांच्या हस्ते त्यांचा हृद्य सत्कार करण्यात आला. प्रभारी आगारप्रमुख अमोल बनकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी वाहतूक निरीक्षक सांगळे, खंडीझोड, अविनाश गायकवाड, संजय गाडे, वाहतूक नियंत्रक मुकुंद बिडवे, विनोद रोहोम, श्रीमती चव्हाण, श्रीमती देठे आदींसह एसटी कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते. दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ठिकठिकाणी झालेल्या कार्यक्रमास भाजपचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहम, शहराध्यक्ष दत्ता काले, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, माजी उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे, माजी नगरसेवक बबलूशेठ वाणी, जनार्दन कदम, अशोकराव लकारे, बाळासाहेब आढाव, वैभव गिरमे, संदीप देवकर, कैलास खैरे, प्रमोद नरोडे, वैभव आढाव, भाजयुमोचे शहराध्यक्ष अविनाश पाठक, दीपक वाजे, रवींद्र रोहमारे, गोपीनाथ गायकवाड, दीपक गायकवाड, माजी नगरसेवक व भीम सरकार ग्रुपचे संस्थापक जितेंद्र रणशूर, देवराम पगारे, शंकर बिऱ्हाडे, नितीन शिंदे, अल्ताफभाई कुरेशी, इलियास खाटीक, खालिकभाई कुरेशी, फकीर मोहम्मद पैलवान, रमेश भुपे, सतीश म्हसे, भरत सदर, पिंटू धीवर, सलीम पठाण, भानुदास पवार, नितेश पवार, योगेश उशीर, विकी चव्हाण, राजेंद्र आवारे, रावसाहेब भातनकर, विलास विघे, बाबुराव जगताप, सुरेश मरसाळे, सिद्धार्थ जगताप, शंकर महांकाळे, गौतम रणशूर, राहुल रणशूर, संतोष त्रिभुवन, दीपक जपे, सागर जाधव, गोरख देवडे, विजय गायकवाड, रुपेश सिनगर, राजेंद्र बागुल, सुखदेव जाधव, सोमनाथ म्हस्के, मुक्तारभाई पठाण, शफिक सय्यद, शाहरुख खान, मुन्नाभाई दरपेल,गोपीनाथ सोनवणे, सलीम इंदोरी, रोहन दरपेल, पंकज मोरे, सचिन सावंत, ॲड.गणेश मोकळ, देविदास रोटे, विजय गायकवाड, निलेश डोके, पप्पू दिवेकर, संजय पवार, विजय चव्हाणके, सद्दामभाई सय्यद, समीर गवळी, चंद्रकांत वाघमारे, मुकुल उबाळे, आकाश अंभोरे, मुकेश धुळे, प्रभाकर थोरात, अतुल गुंजाळ, भीमा महांकाळे, राहुल गायकवाड, विशाल बडदे, ऋषी कांबळे, सागर उबाळे, रोहित बडदे, अनिकेत रणशूर, शैलेश सातपुते, सिद्धार्थ गव्हाळे, वैभव रणशूर, रंजन त्रिभुवन, बबलू मरसाळे,दिलीप मरसाळे, आविष्कार रणशूर,अनिल पगारे,आकाश डोखे,कैलास सोनवणे,सागर पवार,गौतम उबाळे आदींसह भाजप, भाजयुमो, भाजपच्या विविध आघाड्यांचे पदाधिकारी, रिपाइं (आठवले गट) तसेच दलित व आंबेडकरी चळवळीतील नेते, कार्यकर्ते व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


