सामाजिक
शेतक-यांचा सर्वांगीण विकासासाठी संघर्ष करत आयुष्य पणाला लावले असा ज्ञानमहर्षी पुन्हा होणे नाही.:-राहुल सिध्दार्थ उगले
शेतक-यांचा सर्वांगीण विकासासाठी संघर्ष करत आयुष्य पणाला लावले असा ज्ञानमहर्षी पुन्हा होणे नाही.:-राहुल सिध्दार्थ उगले
गोर गरीबांचे आधारवड – स्व. शंकरराव कोल्हे
संपादक:- रविंद्र जगताप
महाराष्ट्र ही नवरत्नांची खाण आहे. येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा बाणा सर्वांनाच परिचयाचा आहे. या स्वराज्यात अठरापगड जातीचे लोक आजही गुण्यागोविंदाने नांदत आहे. अशा कितीतरी शतकांचा इतिहास आपण वाचला, अभ्यासला आहे. महाराष्ट्रात विसाव्या शतकात असंख्य धुरंधर नेते लाभले, त्यांनी बुध्दीमत्तेच्या जोरावर एक वेगळी ओळख निर्माण करून दिली त्यात संजीवनी उद्योग समुहाचे सर्वेसर्वा, माजीमंत्री, सहकारमहर्षी स्व. शंकरराव गेनूजी कोल्हे यांचे नांव विशेषकरून सर्वांनाच परिचयाचे आहे. जनसामान्यांच्या प्रश्नाची सोडवणुक करण्यासाठी उदयास आलेले नेतृत्व त्यांच्यात होते.

राजकीय सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक आदि क्षेत्रात काम करतांना त्यांनी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी १८ पगड समाजाच्या सहका-यांनी सोबती म्हणून बरोबर घेतले तद्वत पुरोगामी विचारांचा वारसा माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी जपत महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती राजश्री शाहु महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा तळागाळात नेण्यांचा अटोकाट प्रयत्न केला. माणूस केंद्रबिंदू मानून समाजकार्य सुरू ठेवले. सर्वसामान्यांच्या सुख दुःखात ते सहभागी झाले. विविध शासकीय निमशासकीय सेवासुविधा उपेक्षीतांच्या दारापर्यंत पोहोचविल्या. आदिवासी समाजाला उदरनिर्वाहासाठी जमिनीचे वाटप, शेतीसाठी अल्पदरात विद्युत मोटारींचा पुरवठा, खावटी कर्ज, दुधाळ उत्पादन वाढीसाठी गाय म्हशी गट वाटप, जातीचा दाखला अशा एक ना अनेक योजना त्यांच्यापर्यंत पोहोचविल्या. कोपरगांव शहरात घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर तसेच लोकशाहिर अण्णाभाउ साठे यांचा पहिला पुतळा उभारण्याचे स्व. शंकररावजी कोल्हे यांनी केले जे काय रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोचि साधु ओळखावा, देव तेथेचि जाणावा !! या संत तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत तळागाळात स्वतःला झोकुन देत स्व. शंकरराव कोल्हे यांनी कार्य केले. त्यांच्या सुख दुःखात सामिल होत जीवनमार्गाक्रमण केले. सर्वसामान्य वंचित घटकांचे जीवन प्रकाशमान करण्यासाठी त्यांनी काजव्याच्या रूपात काम केले.
शतेषु जायते शुर सहस्स्त्स्त्रेषु पंडीत !
वक्ता दससस्त्रेषु दाता भवति वा न वा !!
शंभरात एखादा, शुर जन्माला येतो, हजारात एखादा विद्वान पंडीत होतो. दहा हजारात एखादा वक्ता असो, मात्र दाता निर्माण होणे अतिदुर्लभ असते. ही उक्ती स्व. शंकरराव कोल्हे यांना तंतोतंत लागू होते. ते सर्वांसाठी दाता होते. त्यांचाच वसा दुसरी पिढी बिपीनदादा कोल्हे, तिसरी पिढी विवेक भैय्या कोल्हे पुढे चालवत आहे. शेतक-यांचा सर्वांगीण विकासासाठी संघर्ष करत आयुष्य पणाला लावले असा ज्ञानमहर्षी पुन्हा होणे नाही. त्यांच्या कार्याला विनम्र अभिवादन.
राहुल सिध्दार्थ उगले, लक्ष्मणवाडी (संवत्सर) ता. कोपरगांव, जि. अहमदनगर मो. ९१३० ९४०९००



