आर जे एस कॉलेज ऑफ फार्मसीमधील विद्यार्थ्यांचे हॉलीबॉल स्पर्धेत यश
कोपरगाव प्रतिनिधी कोपरगाव :- डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे, रायगड यांनी आयोजित केलेल्या विविध स्पर्धा संपन्न झाल्या त्यात व्हॉलीबॉल स्पर्धांमध्ये राष्ट्रसंत जनार्दन स्वामी कॉलेज ऑफ फार्मसी,कोकमठाण या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली आहे. विद्यापीठस्तरीय स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी यश संपादन करत त्यातील बहुतांश विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी निवड झाली आहे.व्हॉलीबॉल स्पर्धेत आर जे एसच्या विद्यार्थीनीच्या संघाने प्रथम पारितोषिक पटकावले तसेच विद्यार्थ्यांनी उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली.या स्पर्धेतून जागृती डमडेरे, गुंजन विखे,जयश्री गावित,काजल चिंधे,आणि ऋतिक जपे या विद्यार्थ्यांची पुणे झोनल विभागातून DBATU विद्यापीठ संघात निवड करण्यात आली.राष्ट्रसंत जनार्दन स्वामी कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयामध्ये अभ्यासक्रमा सोबतच विद्यार्थ्यांचा बौद्धिक क्रीडा आणि कलात्मक असा सर्वागीण विकास व्हावा यासाठी सर्व शिक्षक वर्ग नेहमी प्रयत्नशील असतात तसेच संस्थाचालक चांगदेव कातकडे हे नेहमी त्यासाठी प्रोत्साहन देतात त्यातूनच विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टीकोन, कला आणि क्रिडा गुणांचा विकास होण्यासाठी त्यांना मार्गदर्शन केले जाते. तसेच विविध महाविद्यालयीन स्पर्धामध्ये भाग घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरित केले जाते याचाच परिणाम म्हणून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना विविध स्पर्धामध्ये उज्वल यश प्राप्त होत आहे.
जाहिरात
या स्पर्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे, रायगड येथे आयोजित करण्यात आले होते त्यातील सर्व यशस्वी विद्यार्थी व विद्यार्थ्यानीचे संस्थेचे अध्यक्ष चांगदेव कातकडे, संस्थेचे सेक्रेटरी प्रसाद कातकडे, विजय कडू, दिपक कोटमे तसेच फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.नितीन जैन,उपप्राचार्या सौ.उषा जैन,क्रिडा प्रमुख सचिन चव्हाण व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी सदर यशाबद्दल अभिनंदन केले आहे.
स्पर्धा खेळाडूच्या जीवनाचा एक भाग असतो. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थीनी प्रत्येक स्पर्धेतील खेळात भाग घेऊन आपल्या कला कौशल्याला वाव दिला पाहिजे. तसेच कोणताही खेळ खेळाडूसाठी एखादी स्पर्धा अंतिम असू शकत नाही. असे प्रतिपादन दिपक कोटमे यांनी केले.उद्योजक श्री विजय कडू म्हणाले कि,जय किंवा पराजय हा खेळाचा अविभाज्य घटक आहे. त्यामुळे जिंकणारे विद्यार्थी हा त्या अभिन्दनास पात्र आहेत.तर उपांत्य फेरी पर्यत् मजल मारणारे राष्ट्रसंत जनार्दन स्वामी कॉलेज ऑफ फार्मसीचे विद्यार्थ्यांचे अभिनंदन ही तितकेच महत्वाचे आहे.कारण त्यांच्यामुळे जिंकणाऱ्या खेळाडूंना यश मिळविण्याची संधी मिळते. सर्व क्रीडा प्रकारात भाग घेणाऱ्या आर जे एस फाउंडेशन तर्फ सर्व विद्यार्थी खेळाडूंना टी-शर्ट वाटप करण्यात आले.