महाराष्ट्र

माणुसकी सोशल फौडेशन नाशिक संचलित ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या राष्ट्रीय कार्यकारीणी मार्गदर्शक पदी:- पुरुषोत्तम पगारे

माणुसकी सोशल फौडेशन नाशिक संचलित ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या राष्ट्रीय कार्यकारीणी मार्गदर्शक पदी:- पुरुषोत्तम पगारे

कोपरगाव – भारत सरकार नोंदणी कृत माणुसकी सोशल फौडेशन नाशिक संचलित ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या राष्ट्रीय कार्यकारीणी मार्गदर्शक पदी येथील भारत सरकारचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त पुरुषोत्तम पगारे सर यांची निवड एकमताने करण्यात आली.या बाबत प्रसिद्धी पत्रकात पगारे यांनी सांगितले भारत सरकार मान्यता प्राप्त ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीचे विविध राज्यात सुरु असून “जागो ग्राहक जागो” ही चळवळ तळागाळा पर्यत पोहचली पाहिजे हा समितीचा उद्देश आहे. सरकारी निमसरकारी व खाजगी आस्थापना मध्ये मोठया प्रमाणात जनजागृती निर्माण करण्यात अग्रेसर आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात सर्व तालुक्यात समितीच्या नेमणूका केल्या जाणार आहे. तरी या कार्यात सहभागी होवू इच्छिणारांनी संपर्क साधावा असे आवाहन पगारे यांनी केले.

पुरुषोत्तम पगारे हे गेल्या ४० वर्षापासून शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून विविध सामाजिक व शैक्षणिक संस्थांच्या पदावर कार्यरत आहे. शासनाची मान्यता घेवून गेली ३३ वर्षा पासून रात्रशाळा चालविणे, हिंदी या राष्ट्रभाषेचा महाराष्ट्र भर प्रचार प्रसार करतांना जिल्हा पातळीवर तज्ञ मार्गदर्शक म्हणून प्रशिक्षण देणे, हिंदीच्या परीक्षांना विद्यार्थी बसविणे या शिवाय वाचन संस्कृती वाढविण्या साठी शासनाची मान्यता घेवून सार्वजनिक वाचनालय चालविणे यासारखी अनेक कार्य सुरू आहे. या निवडी बदल त्यांचे अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे