के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा

कोपरगाव : कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीच्या के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी सोमैया विद्यामंदिर लक्ष्मीवाडीचे मुख्याध्यापक श्री. राऊत, महाविद्यालयाचे माजी शिक्षक श्री. आमटे, श्री. निकम, श्री. डोंगरे, श्रीमती सोनवणे, महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. सोनवणे, डॉ. कोंडा आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय ठाणगे हे होते.

महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी हे शिक्षक दिनाचे औचित्य साधून एक दिवसाचे शिक्षक झालेले होते. त्यांनी दिवसभर अध्यापनाचे कार्य केले. त्यानंतर महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणात शिक्षक दिन समारंभ पार पडला.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक एका दिवसाची विद्यार्थी प्राचार्या ईश्वरी देवकर हिने केले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा प्राचार्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांतर्फेही प्राचार्य, उपप्राचार्य आणि सर्व शिक्षक यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर प्रगती आढाव, गायत्री थोरात आणि मयुरी शहाणे या विद्यार्थिनींनी मनोगते व्यक्त केली तसेच जोगेश्वरी वाणी, समृद्धी जोशी व मानसी आढाव यांनी कविता सादर केल्या. यानंतर प्रा. अशोक सूर्यवंशी, श्री. कामटे, श्री. राऊत यांची भाषणे झाली. अध्यक्षीय भाषणात डॉ. ठाणगे म्हणाले की, शिक्षक हा समाज घडवणारा एक महत्वाचा घटक आहे. ज्या महापुरुषांनी देशाला घडवले आहे त्यात बहुतांश शिक्षक होते. त्यामुळे देशाचा वैचारिक जडणघडणीत शिक्षकांचे योगदान बहुमूल्य आहे.कार्यक्रमाच्या शेवटी वाणिज्य विभागातर्फे शिक्षक दिवसाचे महत्व सांगणारे नृत्य सादर करण्यात आले. आभार प्रा. डॉ. दीपक बुधवंत यांनी केले तर सूत्रसंचालन महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. सुप्रिया पाटील हिने केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
संपादक रवींद्र जगताप
सत्य एक्सप्रेस न्युजच्या व्हाँटसाँप ग्रुपवर सहभागी होण्यासाठी खालिल लिंक दाबा
https://chat.whatsapp.com/JcX8YoNk9gs6W6YGtE20ZI?s=cl&p=a&ilr=0&amv=2
बातम्यासाठी 9175751349 हा नंबर आपल्या व्हाटसाँप ग्रुपला अँड करा
संपादक रवींद्र जगताप


