ब्रेकिंग

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख सरसेनापती वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त कोपरगाव शिवसेनेच्या वतीने अभिवादन

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख सरसेनापती वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त कोपरगाव शिवसेनेच्या वतीने अभिवादन

कोपरगाव | प्रतिनिधी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज, १७ नोव्हेंबर २०२६ रोजी कोपरगाव शिवसेनेच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र आदरांजली वाहण्यात आली.या प्रसंगी बोलताना कोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष राजेंद्रजी झावरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, “बाळासाहेब ठाकरे हे केवळ एक नेते नव्हते, तर सामान्य माणसाच्या मनात स्वाभिमान जागवणारे एक झंझावाती विचार होते. मराठी माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी त्यांनी दिलेले योगदान सदैव प्रेरणादायी राहील. त्यांचे विचार हीच आपली खरी ताकद आहे.”


या वेळी कोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष राजेंद्रजी झावरे, कोपरगाव तालुका ऑटो रिक्षा संघटनेचे अध्यक्ष कैलासभाऊ जाधव, ग्राहक संरक्षण कक्षेचे माजी जिल्हाप्रमुख मुकुंद सिनगर, शिवसेना शहरप्रमुख अक्षय जाधव, माजी नगरसेविका वर्षाताई शिंगाडे, कुकूशेठ सहानी, बाळासाहेब साळुंके, विकास शर्मा, दिलीपराव आरगडे, मकरंद जोशी, सोमनाथजी शिंगाडे, विक्रांत झावरे, शेखरभाऊ कोलते, राहुल देशपांडे, सुनील साळुंखे,नरेंद्र बैरागी, रवी खिल्लारे, अभिषेक आव्हाड, सतीश लोळगे, श्रीपाद भसाळे, विशाल झावरे, पांडुरंग देवरे, रवींद्र खिल्लारे, बबन जोगदंड, अशोक पवार, ललित ठोंबरे, अशोक अस्गे यांच्यासह सर्व शिवसैनिक व कोपरगाव तालुका ऑटो रिक्षा संघटनेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी बाळासाहेबांच्या स्मृतींना उजाळा दिला.

 

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे