ब्रेकिंग

संबंधीत अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाही न झाल्यास आत्मदहन करण्याचा विजय सुधाकर जाधव यांनी दिला इशारा

संबंधीत अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाही न झाल्यास आत्मदहन करण्याचा विजय सुधाकर जाधव यांनी दिला इशारा

कोपरगाव : – अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या रस्ता रुंदीकरणाच्या खूना निश्चित करून रस्त्याचे योग्य ते मोजमाप होऊन नियमानुसार वापरले जाणारे मटेरियलचा फलक दर्शनी भागात लावून त्याचप्रमाणे मटेरियलचा वापर होऊन सदर रस्ता डांबरीकरण होऊन मिळावा या मागणीसाठी अनेक वेळा संबंधित अधिकारी, कर्मचारी वर्ग यांस प्रत्यक्ष भेटून निवेदन देऊन सुद्धा संबधित अधिकारी यांनी माझी वारंवार दिशाभूल करून खोटी आश्वासने देऊन वेळ मारुन नेण्यात आल्याचे माझ्या लक्षात आले आहे, तरी सामाजिक जाणिवेतून दि. १४ ऑगष्ट २०२६ पर्यंत संबंधीत अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाही न झाल्यास विजय सुधाकर जाधव रा. मुर्शतपूर यांनी दि. १५ ऑगष्ट २०२६ रोजी आत्मदहन करणार असल्याचा इशारा आपल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, सामाजिक कार्यकर्ते विजय सुधाकर जाधव यांनी कोपरगांव जुना टाकळी रोड एम. डी. आर. ९९ निवारा कॉर्नर ते नक्षत्र मंगल कार्यालय या कामाची खातेनिहा चौकशी करून सदर रस्ता प्रलंबीत कामाबाबत संबधितांनी अधिकारी यांनी दि. १४ ऑगष्ट पर्यंत योग्य तो निर्णय घ्यावा, अन्यथा दि. १५ ऑगष्ट २०२६ (स्वतंत्र दिन) रोजी तहसिल कार्यालय कोपरगांव येथे आत्मदहन करणार असल्याबाबत व संबंधीत अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाही करण्यात यावी याबाबत प्रसिद्धी पत्राद्वारे विनंती वजा इशारा दिला आहे.

दि. ४ फेब्रुवारी २०२६ रोजी तहसील कार्यालयाच्या दालनात तहसीलदार महेश सावंत यांच्या उपस्थितीत संबंधित अधिकारी, नगरपरिषद अधिकारी, भूमिअभिलेख विभागाचे प्रतिनिधी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती. या बैठकीत एम.डी.आर.-९९ रस्त्याची मोजणी करून हद्दीच्या खुणा निश्चित करणे, रस्त्याच्या कामात वापरण्यात येणाऱ्या साहित्याची माहिती दर्शविणारा फलक लावणे आदी सूचना करण्यात आल्याचा दावा जाधव यांनी केला आहे.मात्र, या सूचनांची अंमलबजावणी न करता रस्त्याचे काम सुरू करण्यात आले असून, रस्त्याचे मोजमाप न करता निकृष्ट दर्जाची खडी वापरली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याबाबत संबंधित अधिकारी, ठेकेदार, कामगार तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन पूर्वीच्या बैठकीतील सूचनांची अंमलबजावणी करण्याची मागणी केल्याचेही त्यांनी सांगितले.दरम्यान, यापूर्वी तहसील कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, तत्कालीन परिस्थिती आणि संबंधित अधिकाऱ्यांचा सन्मान राखून आंदोलन स्थगित करण्यात आले होते. आता मागण्यांवर योग्य निर्णय न झाल्यास १५ ऑगस्ट रोजी पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा जाधव यांनी दिला आहे.आपल्या आंदोलनादरम्यान आपल्या जीवितास काही अनुचित घटना घडल्यास संबंधित शासकीय विभागांचे अधिकारी जबाबदार राहतील, असा उल्लेखही विजय जाधव यांनी प्रसिद्धीपत्रकात केला आहे. रस्ता कामाची चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी आणि नियमानुसार रस्त्याचे काम पूर्ण करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे