महाराष्ट्र

लौकी ग्रामस्थांना दिलेला शब्द आ.आशुतोष काळेंनी केला पूर्ण रस्त्याचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल ग्रामस्थांनी मानले आभार

लौकी येथील जुना नागपूर-मुंबई हाय-वे ते भवर कदम वस्ती या रस्त्याचे भूमिपूजनप्रसंगी राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ

लौकी ग्रामस्थांना दिलेला शब्द आ.आशुतोष काळेंनी केला पूर्ण रस्त्याचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल ग्रामस्थांनी मानले आभार

कोपरगाव– कोपरगाव मतदार संघातील लौकी गावातील अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या जुना नागपूर-मुंबई हाय-वे ते भवर कदम वस्ती या रस्त्याचे काम विविध अडचणींमुळे मागील अनेक वर्षापासून रखडलेले होते. परंतु या रस्त्याच्या कामात येणाऱ्या अडचणी दूरू करून रस्त्यासाठी निधीही देवू हा शब्द आ.आशुतोष काळे यांनी लौकी ग्रामस्थांना दिला होता. तो शब्द पूर्ण करून त्यांनी पूर्ण करून या रस्त्याच्या सर्व अडचणी दूर होवून या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन शनिवार (२६ रोजी) ग्रामस्थांच्या हस्ते पार पडले. त्याबद्दल लौकी ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून ग्रामस्थांनी आ.आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.

जुना नागपूर-मुंबई हाय-वे ते भवर कदम वस्ती हा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत बिकट अवस्थेत होता. मोठे खड्डेधूळपावसाळ्यात चिखल यामुळे ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. शाळकरी विद्यार्थीशेतकरी,वृद्ध नागरिक तसेच रुग्णांनाही जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता.परंतु रस्ता करण्यासाठी अनेक अडचणी येत असल्यामुळे त्यावर मार्ग निघत नव्हता. त्याबाबत लौकी ग्रामस्थांनी त्यांच्या अडचणी आ.आशुतोष काळे यांच्याकडे मांडल्या होत्या. नागरिकांना होणाऱ्या त्रासाची दखल घेवून आ.आशुतोष काळे यांनी या प्रश्नात स्वतः लक्ष घालून या रस्त्याच्या कामासाठी येणाऱ्या अडचणी दूर केल्या. संबंधित सर्व प्रशासकीय मान्यता या रस्त्यासाठी मिळवून दिल्यामुळे या रस्त्याच्या कामातील सर्व अडथळे दूर झाले आणि प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली आहे.

जाहिरात

 सुमारे साडेसातशे मीटर लांबीच्या या रस्त्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी आमदार निधीतून आवश्यक निधी दिला.आजतागायत या रस्त्यास कोणत्याही प्रकारचा शासकीय निधीचा लाभ मिळू शकला नव्हता. मात्र आ.आशुतोष काळे यांनी या समस्येची गांभीर्याने दखल घेत रस्त्याच्या कामासाठी प्रथमच शासकीय निधी उपलब्ध करून दिला. हा रस्ता पाटबंधारे विभागाच्या हद्दीतून जात असल्याने कामासाठी आवश्यक परवानग्या मिळणे ही मोठी अडचण होती. अनेक वर्षे या परवानग्या आणि निधी अभावी रस्त्याचे काम रखडले होते.मात्र हा प्रश्न आता सुटणार असल्यामुळे लौकी ग्रामस्थांमध्ये विशेषत: प्रभाग क्रमांक तीनच्या नागरीकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.उद्घाटन कार्यक्रमप्रसंगी कोपरगाव तालुका जिनिंग प्रेसिंगचे संचालक शिवाजी शेळकेसरपंच अंजीनाथ खटकाळेकिरण शेळके उपसरपंच,राजेंद्र खिलारीयशवंत कदमत्र्यंबक खटकाळेसागर खटकाळेबाबासाहेब खटकाळेअंबादास खटकाळेमच्छिंद्र इंगळेसुजित कदमभाऊसाहेब गोडसेबबन भवरभाऊसाहेब भवरवाजिनाथ कदमसावळीराम खटकाळेविलास इंगळेसुभाष कदम आणि नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते. मागील अनेक वर्षापासूनचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल लौकी ग्रामस्थांनी आ. आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.

 हा रस्ता पूर्ण होणार असल्यामुळे लौकी गावाच्या नागरिकांचा दैनंदिन प्रवास सुलभ होणार असून शेतीमाल वाहतूकआपत्कालीन सेवा तसेच विद्यार्थ्यांची शाळेत जाण्याची अडचण दूर होणार आहे. या रस्त्यामुळे गावाच्या विकासाला चालना मिळणार असून नागरिकांच्या अडचणी सोडवून त्यांची सेवा करणे हेच आपले ध्येय आहे.

आ.आशुतोष काळे.  

संपादक रवींद्र जगताप,कोपरगाव

सत्य एक्सप्रेस न्युजच्या व्हाँटसाँप ग्रुपवर सहभागी होण्यासाठी खालील लिंक दाबा

https://chat.whatsapp.com/IWdNrQEPOAw6LDkI6AkHAk

दिपावलीचे नवे स्वरूप राजकीय ओली दुष्काळाची दिवाळी २०२५ कशी जाणुण घ्या खालिल लिंक दाबून

https://youtu.be/oLgXcz2aurI?si=qTBddf2E2_ymu5vX

सत्य एक्सप्रेस youtbe chhanal पहाण्यासाठी खालील लिंक दाबा व चँनल सबस्क्राईब करा

https://www.youtube.com/@satyaexpressnews

धार्मिक ब्लाँग पहाण्यासाठी खालील लिंक दाबा

https://youtube.com/playlist?list=PL3j0O8rqVMWP4evas-rsmf1AV4ZkbIr8j&si=ZWWHIRV6FcdqDo2I

 

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे