पोलीस बॉईजच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षपदी संदिप विदुर यांची निवड

कोपरगाव प्रतिनिधी :- पोलीस बॉईजच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षपदी संदिप विदुर यांची निवड करण्यात आली सदरील निवड संघटनेचे संस्थापक रविभाऊ वैद्य डॉ छबूराव ताके यांनी केली पोलीस व जनतेच्या न्याय हक्का साठी संघटना महाराष्ट्र भर लढत असते . संघटनेमुळे पोलीसांच्या मुलानां पोलीस भरती मध्ये पाच टक्के आरक्षण मिळाल आहे. पोलीस भरती मधे सोळाशे मीटर रनिंग मध्ये 50 सेकंद वेळ वाढवून मिळाली आहे महाराष्ट्रभर काम करणारी राज्यातील पहिली अशी ही संघटना आहे व पोलीस बॉईज तर्फे कायदे विषयक मोफत मार्ग दर्शन केले जाते

यांच्या निवडी वेळी प्रदेशाध्यक्ष माणिक निमसे अध्यात्मिक आघाडी प्रदेशाध्यक्ष माऊली सुरळकर कैलास महाराज राजगुरू यांची प्रमुख उपस्थिती होती या निवडी बद्दल मोबिन सय्यद स उपाध्यक्ष गोकुळ दाभाडे कोर कमिटी सदस्य राजू शिरसाठ ज्ञानोबा धुमाळ वाहतूक आघाडी प्रदेशाध्यक्ष रिबेका रोड्रिक्स राज्य उपाध्यक्ष महिला प्रदेश अध्यक्ष विजया बावदाणे नारायण महाराज भांबर्डे मराठवाडा संघटक माया महानोर जयश्री दाभाडे ॲड संगीता भटड्ड ॲड स्वप्ना कुलकर्णी लता बन संगीता राजपूत संजीवनी सोनावणे रिंकू केशवे अंजुषा कुलकर्णी शितल खरात राज ठाकरे मराठवाडा अध्यक्ष शिरीष चव्हाण प्रमोद खाडे डॉ संकेत चन्ने बाळकृष्ण शेवंती अरुण गणपुरे अरुण सदाशिवे ॲड शिवप्रसाद गायकवाड सागर बनसोडे सुनील पारखे रोहित ताके गणेश बनसोडे सखाराम भोजने अमृत पारधी प्रवीण मोरे शेख रिजवान पांडुरंग पिसुळे कोपरगाव येथील दिपक आरणे आदिनी विदुर यांचे अभिनंदन केलं.




