महाराष्ट्र

सावळी विहीर खुर्द येथे लक्ष्मी आई यात्रा महोत्सव…….

 

सावळी विहीर खुर्द येथे लक्ष्मी आई यात्रा महोत्सव…….

सावळीविहीर विजय खरात/-सालाबाद प्रमाणे यंदाही राहाता तालुक्यातील सावळी विहीर खुर्द येथे लक्ष्मी आई यात्रा महोत्सव होणार आहे या ठिकाणी भक्ती आणि श्रद्धा यांचा अलौकिक संगम पहावयास मिळतो ही देवी भक्ताच्या नवसाला पावणारी देवी म्हणून ओळखली जाते या ठिकाणी मंदीर लगत विद्युत रोषणाई केली जाते तसेच या ठिकाणी मुंबई ,नाशिक ,संभाजी नगर ,अहील्यानगर,सह पंचक्रोशीतील भाविक भक्त देवीच्या दर्शनासाठी येतात सावळीविहीर खुर्द ग्रामदैवत असलेल्या सर्व ग्रामस्थ देवीच्या यात्रेत सहभागी होतात लक्ष्मी आई यात्रा महोत्सव हा होळीच्या दिवशी सोमवार दिनांक 2-3-2026 रोजीआयोजित करण्यात येणार आहे सकाळी लक्ष्मी मातेला अभिषेक करण्यात येणार आहे होम हवन सायंकाळी काठी मिरवणूक, शोभेची दारू , देवीच्या गाण्यांचा कार्यक्रम सादरीकरण करण्यात येणार आहे विशेष म्हणजे गाण्यांची जुगलबंदी होणार आहे संभाजी नगर येथील संतोष शिंदे , भाऊसाहेब शिंदे तसेच शिर्डी येथील किरण बत्तीशे या सोबत नामांकित सुप्रसिद्ध गायक हजेरी लावणार आहे या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन यात्रा कमिटी यांनी केले आहे

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे