कोपरगाव शहरात शिवसेना व वंचित बहुजन आघाडीचे मोठ्या जल्लोषात स्वागत
कोपरगाव शहरात शिवसेना व वंचित बहुजन आघाडीचे मोठ्या जल्लोषात स्वागत
शिवसेना वंचित बहुजन आघाडीचा विजय असो,उध्दव साहेब तुम आगे बढो,उध्दव साहेब तुम संघर्ष करो हम तुम्हारे साथ है,प्रकाश आंबेडकर साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है.अशा गगनभेदी घोषणांनी कोपरगाव शहरात शिवसेना वंचित युतीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.प्रारंभी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला आहे.याप्रसंगी शिवसेना नेते राजेंद्र झावरे म्हणाले,आज अंत्यत आनंदाचा दिवस असुन हिंदु हदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते ते पूर्ण होत आहे.भिम शक्ती शिवशक्ती एकत्र यायला हवी.भिमशक्ती शिव शक्ती एकत्र आल्यास महाराष्ट्रच काय देशाची सत्ता काबीज करण्याची सुध्दा ताकद या दोन्ही शक्तीत आहे.शिवसेना वंचित बहुजन आघाडी युतीमुळे खरोखर आनंद होत असुन लवकरच दोन्ही पक्षासाठी चांगले दिवस येतील.वंचित बहुजन आघाडी सोबत पुढील आंदोलने व निवडणुका सोबतच लढु.वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र संघटक शरद खरात म्हणाले की,महाराष्ट्र ही क्रांतीची भुमी आहे.भाजप हे लोकशाही,संविधान नष्ट करण्याचे काम करत आहे,या कृतीला चेकमेट करण्याचे काम उध्दव साहेब प्रकाश आंबेडकर साहेब हे करणार आहे.येणार्या काळात लोकशाही टिकली पाहिजे,संविधान टिकले पाहिजे,झोपडीतला माणूस राजा झाला पाहिजे,यासाठी आम्ही एकत्र आलो आहे.वंचितचे जिल्हाध्यक्ष विशाल कोळगे म्हणाले की, महाराष्ट्रात नविन पर्वाला सुरुवात झाली आहे.भौगलिक दृष्ट्या काही अडचणी होत्या त्या संपल्या असुन या युतीला फायदाच होणार आहे.शिवसेनेकडे आज जे हात वर होत आहे. ते हात खाली करण्याची ताकद वंचितकडे आहे.शिवसेना शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियाल म्हणाले की,२३ जानेवारी २०२३ ला बाळासाहेब ठाकरे यांच्या ९७ व्या जयंती निमित्ताने हि युती झाली आहे.महाराष्ट्रात हा नवा प्रयोग,नवक्रांती होत आहे.यामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना नवचैतन्य मिळाले आहे.भाजपा कडून इडी,सी.बीआय चा वापर करुन विरोधकांना संपविण्याचे काम केले जात आहे.परंतु आता वंचित शिवसेना युती मुळे मोठी ताकद निर्माण होवुन भविष्य उज्वल असेल.या युतीचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले असुन याप्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे,मुकुंद सिनगर,वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र संघटक शरद खरात,वंचितचे जिल्हाध्यक्ष विशाल कोळगे,अनिल बनसोडे,संजय कोपरे,सचिन दाभाडे,चंद्रकांत खरात,शिवसेना शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियाल,बाळासाहेब जाधव,कुक्कुशेठ सहानी,दिलीप सोनवणे,किरण खर्डे,इरफान शेख, बाळासाहेब साळुंके,राहुल देशपांडे,विजय जाधव,वर्षाताई शिंगाडे, अक्षिता आमले,अश्विनी होणे,शीतल चव्हाण,प्रफुल्ल शिंगाडे,विकास शर्मा,शेखर कोलते,सुनील कुंढारे,किरण अडांगळे,योगेश उशीर,वसीम शेख,सतीश खर्डे,विक्रांत झावरे,प्रवीण शेलार, अशोक पवार,संजय बाविस्कर,सुशील बोर्डे, पिंटू पावसे,विशाल झावरे,निलेश पवार,नानासाहेब पगारे,साईनाथ जाधव,अमोल खरात,नारायण पगारे,राजेंद्र पगारे,दत्तात्रय खंडिखोड,सुनिल भालेराव यांच्यासह शिवसैनिक भिमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





