कोपरगाव शहरात प्रकाशमय होणार वाट,विकासाचा लखलखाट

कोपरगाव शहरात प्रकाशमय होणार वाट,विकासाचा लखलखाट
कोपरगाव शहरातील मध्यवर्ती भाग असलेल्या अहिंसा स्तंभ परिसरात हायमॅक्स दिवे बसविण्यात आले असून, शहराच्या विकासाबरोबरच नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. आ. विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्ष परागजी संधान यांनी व्यापारी बांधवांना दिलेला शब्द पूर्ण केला आहे.

अहिंसा स्तंभ परिसर हा शहरातील महत्त्वाचा आणि नेहमीच वर्दळीचा भाग आहे. रात्रीच्या वेळी या परिसरात पुरेशा प्रकाशाची सुविधा उपलब्ध व्हावी, नागरिक तसेच व्यापारी बांधवांना सुरक्षित वातावरण मिळावे, यासाठी हायमॅक्स दिवे बसविण्यात आले आहेत. या प्रकाशव्यवस्थेमुळे रात्री उशिरापर्यंत ये-जा करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून, विशेषतः महिला भगिनींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनेही हे काम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.कोपरगाव शहरातील विविध भागांमध्ये आवश्यकतेनुसार प्रकाशव्यवस्था मजबूत करण्याचे काम सुरू असून, नागरिकांच्या मागण्या आणि स्थानिक गरजा लक्षात घेऊन विकासकामांना प्राधान्य दिले जात आहे.

अहिंसा स्तंभ परिसरातील हायमॅक्सप्रमाणेच लक्ष्मीआई मंदिर परिसरातही १२ मीटर उंचीचे हायमॅक्स दिवे बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनाही रात्रीच्या वेळी अधिक सुरक्षित आणि प्रकाशमान वातावरणाचा लाभ मिळणार आहे.शहरातील रस्ते, चौक आणि महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी पुरेशी प्रकाशव्यवस्था असणे ही नागरिकांच्या सुरक्षिततेशी जोडलेली बाब आहे. त्यामुळे व्यापारी बांधवांनी केलेल्या मागणीची दखल घेत अहिंसा स्तंभ परिसरात हायमॅक्स बसविण्याचे काम पूर्ण करण्यात आले. दिलेला शब्द प्रत्यक्ष कामातून पूर्ण होत असल्याने व्यापारी बांधवांनी समाधान व्यक्त केले.यावेळी ज्येष्ठ व्यापारी नारायणशेठ अग्रवाल, नगरसेवक अतुलशेठ काले, मा. उपनगराध्यक्ष योगेश बागुल, नगरसेवक विक्रमादित्य सातभाई, नगरसेवक स्वप्निल मंजूळ, संजय उदावंत, संतोष गंगवाल, रवींद्र वाघ, अमित जैन, जैन समाजाचे पंच रवींद्र पाटणी, राकेश काले, पिंकी चोपडा, विशाल बडजाते यांच्यासह व्यापारी बांधव व नगरसेवक, पदाधिकारी सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



