कोपरगाव पुणतांबा एसटी बस साठी किरण बिडवे भरत मोरे यांच्या शिष्टाईला यश


कोपरगाव पुणतांबा एसटी बस साठी किरण बिडवे भरत मोरे यांच्या शिष्टाईला यश
कोपरगाव एसटी बस सकाळी 8/30 वाजता कोपरगाव हुन पुणतांबा येथुन रिटन होत असे या बस सेवेचा लाभ कोकमठाण.सडे.शिगंवे. रस्तापुर.पुणतांबा .मातुलठाण.गोंडेगाव.डोणगाव.चांगदेवनगर.18 वाडी.जळगाव रोड.येथील शालेय.कॉलेज विद्यार्थी विद्यार्थिनी सह प्रवासी जेष्ठ नागरिक महिला माता भगिनी मोठ्या प्रमाणावर लाभ घेत असतात परंतु गेल्या 2/3 महिनेपासुन बस बंद करण्यात आल्या पासुन वेळे अभावी विद्यार्थी वर्गाला शैक्षणिक दैनंदिन सकाळी प्रथम सत्राचा अभ्यासक्रम गैरहजेरीत जात असुन त्यांचे मोठे नुकसान होत आहे यावर विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी कोपरगाव युवतीसेना तालुका अधिकारी नेहा महेश कुलकर्णी यांचे सह कोपरगाव डेपो अधिकारी यांची समक्ष भेट घेऊन संबंधित अधिकारी वर्गाला याची कल्पना देऊन बस चालु केली परंतु दोन तिन दिवसांत बस बंद झाल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणाव आर्थिक व शैक्षणिक नुकसान होत होते यावर विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी पुणतांबा शिवसेना शहरप्रमुख महेश कुलकर्णी यांचे बरोबर संपर्क साधुन त्यांना समस्या सोडविण्यासाठी विनंती केली असता त्यांनी लगेच महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळ कामगार सेंनेचे राज्य उपाध्यक्ष जेष्ठ शिवसैनिक किरण बिडवे कोपरगाव एसटी डेपो कामगार सेंनेचे शहरप्रमुख तथा शिवसेना तालुकाप्रमुख भरत मोरे राजाभाऊ शेख कोपरगाव शहरप्रमुख गगन हाडा.बालाजी गोरडे उपशहरप्रमुख गणेश जाधव यांना फोन सोशल मीडिया मार्फत माहिती दिली असता त्यांनी आज कोपरगाव एसटी डेपो चे अधिकारी श्री बनकर साहेब यांचे कानावर ही समस्या घातली असता त्यांनी पुणतांबा शिवसेना शहरप्रमुख महेश कुलकर्णी यांचे बरोबर बोलणे करुन आपली मागणी सोमवार पासून सोडवण्यात येईल असे आश्वासित केले असता पुणतांबा शिवसेना शहरप्रमुख महेश कुलकर्णी यांनी पुढील आंदोलनाला स्थगिती देऊन कामगार सेंनेचे राज्य उपाध्यक्ष किरण बिडवे तसेच शिवसेना पदाधिकारी. कोपरगाव एसटी डेपो चे अधिकारी श्री बनकर साहेब . रविंद्र गिरमे साहेब त्यांचे सर्व एसटी महामंडळ अधिकारी व कर्मचारी बंधुसह विरभुमी प्रिंट मिडिया जेष्ठ पत्रकार जनार्दन जगताप कान्हेगाव वारी व इलेक्ट्रॉनिक मीडिया सत्य एक्सप्रेस न्युजचे रविभाऊ जगताप कोकमठाण यांचे पुणतांबा शहर शिवसेनेच्या वतीने शहरप्रमुख महेश कुलकर्णी यांनी आभार मानले





