ब्रेकिंग

कोपरगावात दहा दिवसीय श्रामनेर शिबिर उत्साहात सुरू; १५ नोव्हेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत धम्म परिषद

कोपरगावात दहा दिवसीय श्रामनेर शिबिर उत्साहात सुरू; १५ नोव्हेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत धम्म परिषद

कोपरगाव : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया व अखिल भारतीय भिक्खू महासंघ यांच्या कोपरगाव तालुका व शहर शाखेच्या वतीने आयोजित दहा दिवसीय श्रामनेर शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून शिबिराचे आठ दिवस यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहेत. आता शिबिराचे केवळ दोन दिवस शिल्लक असून १५ नोव्हेंबर रोजी या शिबिराचा समारोप होणार आहे. कर्मवीर नगर येथील संत जगनाडे महाराज सांस्कृतिक भवन येथे ५ नोव्हेंबरपासून या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली तसेच चैत्यभूमी दादर येथील भदंत बी. संघपाल व भदंत आनंद सुमनसिरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर सुरू आहे.शिबिरामध्ये सहभागी श्रामनेरांना पूज्य भिक्खू संघाकडून बुद्ध वंदना, त्रिसरण, पंचशील, धम्मपद, बौद्ध संस्कार, श्रामनेर विनय, विपश्यना ध्यान-भावना, भगवान बुद्धांचे जीवनचरित्र तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीचा इतिहास याविषयी सखोल मार्गदर्शन केले जात आहे. या माध्यमातून धम्माचे आचरण, शिस्त, नैतिक मूल्ये आणि बौद्ध विचारांचा प्रसार यावर विशेष भर दिला जात आहे.१८ ते ६० वयोगटातील व्यक्तींना या शिबिरात प्रवेश देण्यात आला असून सहभागी श्रामनेरांची निवास, भोजन व धम्मग्रंथांची व्यवस्था संस्थेच्या वतीने मोफत करण्यात आली आहे. तसेच तालुक्यातील दहा गावांमध्ये संघाच्या माध्यमातून धम्मप्रसाराचे कार्यही केले जात आहे.या शिबिराचा विशेष कार्यक्रम म्हणून १५ नोव्हेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू तथा दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.या सन्मान परिषदेला कोपरगाव तालुक्यासह परिसरातील बौद्ध उपासक, उपासिका, आंबेडकरी अनुयायी व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे