ब्रेकिंग

के. जे. सोमैया महाविद्यालयात मेंटोरिंग सेल अंतर्गत आंतरराष्ट्रीय व्याख्यान संपन्न…

के. जे. सोमैया महाविद्यालयात मेंटोरिंग सेल अंतर्गत आंतरराष्ट्रीय व्याख्यान संपन्न…

के. जे.सोमैया महाविद्यालयात ऑनलाईन पद्धतीने मा. शुभांगी विखे पाटील (सहयोगी प्रबंधक, रॉयल बँक ऑफ कॅनडा, टोरांटो) व्याख्यान देताना.

कोपरगाव (प्रतिनिधी): के. जे. सोमैया (वरिष्ठ) व के. बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात ग्लोबल नगरी फाऊंडेशनच्या ‘मेन्टॉर मित्र पाथ वे टू सक्सेस’ उपक्रमांतर्गत नुकतेच आंतरराष्ट्रीय व्याख्यान सत्र संपन्न झाले. या मार्गदर्शन सत्रात कॅनडातील टोरांटो येथील रॉयल बँक ऑफ कॅनडा च्या सहयोगी प्रबंधक शुभांगी विखे पाटील यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. या व्याख्यानात त्यांनी AI टेक्नोलॉजीच्या काळात उत्कृष्ट मानव संसाधनासाठी अधिक चांगले दिवस आले असल्याचे म्हटले. कोणत्याही क्षेत्रात AI बरोबरच नवीन कौशल्य वाढवल्यास विद्यार्थ्यांना विविध संधी उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादनही त्यांनी केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. विजय ठाणगे म्हणाले कि ग्लोबल नगरी फाउंडेशनचे सदस्य अमेरिकेत असूनही आपल्या मातृभूमीशी आणि मातीशी नाळ घट्ट टिकवून आहेत. विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम नवीन संधी निर्माण करणारा असून या उपक्रमाद्वारे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी नवीन कौशल्ये अंगीकृत करून स्वतःचा सर्वांगीण विकास साधावा. भारतात शिक्षण, शेती, बँकिंग, आरोग्य या क्षेत्रात AI मुळे प्रचंड क्रांती घडून  येणार असून त्यामुळे विद्यार्थ्यांनी पुढील काळातील संधी ओळखून नवनवीन कौशल्य आत्मसात करावी याकडेही त्यांनी लक्ष वेधले. सदर व्याख्यानाचे आयोजन  ग्लोबल नगरी फाऊंडेशनचे महाविद्यालयीन समन्वयक महेश कुहिले, श्रीमती राजेश्वरी मॅडम, व डॉ. रोहित काळे यांनी केले. या ऑनलाईन व्याख्यानाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक मेंटोरिंग योजनेचे समन्वयक प्रो. डॉ. वसुदेव साळुंके यांनी केले. तर आभार सह-समन्वयक प्रो. डॉ. संजय अरगडे यांनी केले.

या व्याख्यानासाठी प्रा. सदाशिव नागरे, प्रा. सचिन जाधव यांच्यासह महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यालयीन प्रबंधक डॉ. अभिजीत नाईकवाडे, डॉ . संजय दवंगे, प्रा. विजय सोमासे यांनी विशेष परिश्रम घेतले.

 

 

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे