ब्रेकिंग

स्नेहलताताई कोल्हे यांच्या प्रयत्नामुळे कोपरगावातील विकासकामांसाठी ७ कोटी २७ लाख ६५ हजार रुपयांचा विक्रमी निधी मंजूर

स्नेहलताताई कोल्हे यांच्या प्रयत्नामुळे कोपरगावातील विकासकामांसाठी ७ कोटी २७ लाख ६५ हजार रुपयांचा विक्रमी निधी मंजूर
संपादक :- रविंद्र जगताप
कोपरगाव : भाजपच्या प्रदेश सचिव तथा माजी आमदार स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांच्या विशेष प्रयत्नामुळे जिल्हा स्तर योजनेतून कोपरगाव शहरातील विविध विकासकामांसाठी ७ कोटी २७ लाख ६५ हजार ८२९ रुपयांचा विक्रमी निधी मंजूर झाला आहे. शासनाने सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (जिल्हा स्तर), लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधारणा योजना, नागरी दलितेतर वस्ती सुधारणा योजना अशा वेगवेगळ्या योजनांतर्गत मंजूर केलेल्या या निधीतून शहरातील रस्ते, गटारी, पेव्हर ब्लॉक आदी कामे मार्गी लागणार आहेत. या विविध कामांना प्रशासकीय मान्यताही मिळाली आहे.
कोपरगाव नगर परिषद हद्दीतील शहरातील विविध मुख्य डांबरी रस्ते, अतिमहत्त्वाचे तीन पूल, अंतर्गत रस्ते, गटारीचे बांधकाम, पेव्हर ब्लॉक आदी विविध विकासाच्या कामांसाठी शासनाने निधी द्यावा, यासाठी माजी आमदार तथा भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलताताई कोल्हे तसेच सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे यांनी राज्याचे महसूलमंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच खासदार सदाशिव लोखंडे यांच्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा केला होता. अखेर स्नेहलताताई कोल्हे व विवेकभैय्या कोल्हे यांच्या प्रयत्नांना यश आले असून, जिल्हा स्तर योजनांमधून कोपरगाव शहरातील विविध विकासकामांसाठी ७ कोटी २७ लाख ६५ हजार ८२९ रुपये एवढा विक्रमी निधी मंजूर झाला आहे. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली गतिमान सरकार कार्यरत असून, महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालय स्तरावरून कोपरगाव शहरातील विविध विकासकामांकरिता ७ कोटी २७ लाख ६५ हजार ८२९ रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
कोपरगाव शहरातील मुख्य वर्दळीच्या रस्त्यांची तसेच त्यांना जोडणाऱ्या अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यांवर दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. या रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहने चालविणे व पायी चालणेदेखील अवघड बनले आहे. हे रस्ते खराब झाल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. या खराब झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती होणे गरजेचे असून, नागरिकांचे होत असलेले हाल लक्षात घेऊन स्नेहलताताई कोल्हे व विवेकभैय्या कोल्हे यांनी महसूलमंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी वारंवार पत्रव्यवहार करून या रस्त्यांच्या कामांना मंजुरी आणि निधी  देण्याची मागणी केली होती. तसेच खासदार सदाशिव लोखंडे यांच्या माध्यमातूनही त्यांनी यासाठी  पाठपुरावा केला होता. अखेर स्नेहलताताई कोल्हे व विवेकभैय्या कोल्हे यांच्या प्रयत्नांमुळे शहरातील विविध विकासकामांसाठी सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (जिल्हा स्तर), लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधारणा योजना, नागरी दलितेतर वस्ती सुधारणा योजना अशा विविध योजनांमधून
७ कोटी २७ लाख ६५ हजार ८२९ रुपये एवढा निधी मंजूर झाला असून, या कामांना प्रशासकीय मान्यताही दिली आहे.या निधीतून शहराच्या विविध भागातील रस्त्यांचे मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यात येणार आहे. तसेच पूल, गटारी, पेव्हर ब्लॉक आदी कामेदेखील करण्यात येणार आहेत. गेल्या साडेतीन वर्षांत कोपरगाव शहराच्या विविध भागातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. खराब रस्ते आणि धुळीमुळे नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. नागरिक रस्ते, गटारी, पाणी व इतर विविध समस्यांमुळे हैराण झाले असताना विद्यमान आमदारांचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. नागरिकांना भेडसावणारे विविध प्रश्न सोडविण्यासाठी माजी आमदार तथा भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलताताई कोल्हे व युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांनी पुढाकार घेऊन शहरातील रस्ते, पूल, गटारी, पेव्हर ब्लॉक आदी विविध कामांसाठी शासनाकडून निधी मिळावा, यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. स्नेहलताताई कोल्हे आणि विवेकभैय्या कोल्हे यांनी शासनाकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे शहरातील विविध विकासकामांसाठी प्रथमच जिल्हा स्तर योजनांमधून एवढ्या मोठ्या प्रमाणात विक्रमी निधी कोपरगाव शहरास मंजूर झाला आहे. त्याबद्दल नागरिकांनी आंनद व्यक्त करून त्यांचे आभार मानले आहेत.



सत्य एक्सप्रेस न्युजच्या व्हाटसाँप ग्रुपवर सहभागी होण्यासाठी खालील लिंक दाबा

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे