आरोग्य व शिक्षण
राष्ट्रवादीच्या वतीने रविवारी १० वी १२ वीच्या गुणवंतांचा गौरव सोहळा

राष्ट्रवादीच्या वतीने रविवारी १० वी १२ वीच्या गुणवंतांचा गौरव सोहळा
संपादक रविंद्र जगताप
कोपरगाव :- कोपरगाव विधानसभा मतदार संघातील १० वी व १२ च्या परीक्षेत दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या गुणवंतांचा रविवार (दि.११) रोजी सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. माजी आमदार अशोकराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमात आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते गुणवंतांचा सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी मराठी सिने सृष्टीतील प्रसिद्ध सिनेअभिनेते अंकुश चौधरी उपस्थित राहणार असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी यांनी दिली आहे.
शैक्षणिक वाटचालीत १० वी व १२ वीचे वर्ष अतिशय महत्वाचा टप्पा असून या परीक्षेत मिळविलेल्या यशातून भविष्यातील ध्येय गाठण्यास मोठी मदत होते.त्यामुळे १० वी व १२ वीचे विद्यार्थी या परीक्षेत जास्तीत जास्त गुण मिळविण्यासाठी कठोर परिश्रम घेवून यश संपादन करीत असतात. १० वी व १२ वी परीक्षेत दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या गुणवंतांचा काळे परीवाराने दरवर्षी सन्मान करण्याची सुरु केलेली परंपरा आ. आशुतोष काळे यांनी पुढे सुरु ठेवली आहे. त्यामुळे यावर्षी देखील या गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी रविवार (दि.११) रोजी सकाळी ११.०० वाजता साईबाबा तपोभूमी येथे १० वी व १२ वीचे गुणवंतांचा व त्यांच्या पालकांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या सन्मान सोहळ्यासाठी आ. आशुतोष काळे यांच्या समवेत मराठी सिने सृष्टीतील प्रसिद्ध सिनेअभिनेते अंकुश चौधरी हे देखील उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी १० वी व १२ च्या परीक्षेत दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या गुणवंतांनी व त्यांच्या पालकांनी उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे वतीने करण्यात आले आहे.
ताज्या बातम्यासाठी आमच्या व्हाटसाँप ग्रुपवर सहभागी व्हा,सहभागी होण्यासाठी खालिंल लिंक दाबा https://chat.whatsapp.com/CTDmmJtLO0G0xxPjGv1gcS




