






शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्य दुकानांमधून दरमहा धान्य वितरण होत असताना दिव्यांग व्यक्तींनाही इतर लाभार्थ्यांप्रमाणे बराच वेळ रांगेत उभे राहावे लागते. शारीरिक अडचणींमुळे दिव्यांग व्यक्तींना जास्त वेळ उभे राहणे शारीरिकदृष्ट्या त्रासदायक असूनही नाईलाजाने त्रास सहन करून त्यांना इतर लाभार्थ्यांप्रमाणे रांगेत उभे राहावे लागत असल्यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. याची आमदार आशुतोष काळे यांनी दखल घेवून यापुढे दिव्यांग लाभार्थी स्वतः धान्य घेण्यासाठी स्वस्त धान्य दुकानात दुकानात आल्यास त्यांना कोणतीही प्रतीक्षा न करायला लावता त्यांना प्रथम धान्याचे वितरण करावे.दिव्यांग लाभार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास अथवा गैरसोय होणार नाही याची काळजी घेऊन त्यांना सहकार्य करावे. या सूचनांची सर्व स्वस्त धान्य दुकानदारांकडून काटेकोरपणे अंमलबजावणी होईल याची दक्षता घ्यावी असे निर्देश आ.आशुतोष काळे यांनी तहसीलदारांना दिले आहेत.यामुळे वर्षानुवर्ष रांगेत उभ्या राहणाऱ्या दिव्यांग बंधू-भगिनींना यापुढे स्वस्त धान्य दुकानांतील रांगेत उभे राहावे लागणार नाही.आ.आशुतोष काळे यांनी घेतलेल्या या संवेदनशील भूमिकेबद्दल मतदार संघातील सर्व दिव्यांग बंधू-भगिनींनी समाधान व्यक्त केले असून आ.आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.





