माजी जि.प. सदस्य.संपतराव भारुड यांनी शिर्डी लोकसभा निवडणूक लढवावी समाजातून होत आहे मागणी
माजी जि.प. सदस्य.संपतराव भारुड यांनी शिर्डी लोकसभा निवडणूक लढवावी समाजातून होत आहे मागणी
शिर्डी लोकसभा मतदारसंघातून आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते संपतराव भारुड यांनी शिर्डी लोकसभा निवडणूक लढवावी असे समाजातून मागणी होत आहे राज्यातील सर्वच प्रस्थापित राजकीय पक्षांनी बौद्ध समाजाचा उमेदवार नाकारला आहे अनुसूचित जातीमध्ये बौद्ध समाजाची 65 टक्के पेक्षा जास्त लोकसंख्या एकट्या समाजाची असून सर्वच पक्षांनी बौद्ध समाजाचा उमेदवार नाकारला आहे .यासाठी समाजाने एकत्र येऊन या विरोधात आवाज उठविला आहे भविष्यात समाजाला तिकीट नाकारणाऱ्या पक्षांविरोधात ठोस भूमिका घेण्यासाठी त्याचबरोबर रणनीती आखून समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करायला हवे असे ज्येष्ठ नेते संपतराव भारुड म्हणाले आहे .त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की बौद्ध समाजाला उमेदवारी नाकारण्यात येत आहे त्यामुळे समाजातील अनेकांनी मला फोन करून सांगितले की ,आपल्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे लोकसभा निवडणुकीमध्ये समाजातून संपतराव भारुड यांनी निवडणूक लढवावी अशी मागणी होत आहे त्यामुळे संपतराव भारुड यांनी समाजासाठी निवडणूक लढविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.




