ब्रेकिंग

लहान मुलांचे सोनेरी बालपण जपुया…- सुशांत घोडके

लहान मुलांचे सोनेरी बालपण जपुया…- सुशांत घोडके

सिताराम पाटील थोरात नॅचरल लाईफ स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न…

लहान मुले ही देवाघरची फुले असे आपण म्हणतो तेव्हा शैक्षणिक क्षेत्रात त्यांचेवर संस्कार करतांना त्यांचे बालपण टवटवीत ठेवून सोनेरी बालपणाच्या क्षणांची जपवणूक करण्याचे आवाहन महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार सन्मानित सुशांत घोडके यांनी केले.श्रीरामपूर तालुक्यातील गोंडेगाव येथील नायगांव रस्त्यालगत विजय थोरात रिसर्च फाउंडेशन योगा आयुर्वेद आणि एज्युकेशन संस्थेचे सिताराम पाटील थोरात नॅचरल लाईफ स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन आणि शांताई लाॅन रंगमंच लोकार्पण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार सन्मानित सुशांत घोडके, पुणतांबा पाणलोट समितीचे सचिव सामाजिक कार्यकर्ते विनोद धनवटे,द्वारकाधीश पेट्रोलियमचे संचालक प्रकाशराव बनकर, शिवाजी थोरात, सेवानिवृत्त पाटबंधारे अभियंता साहेबराव चोभे,आप्पासाहेब थोरात, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजय थोरात, सौ. जयश्री थोरात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

प्रारंभी दीपप्रज्वलन, सरस्वती पुजन, सरस्वती स्तवन करुन कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. शालेय विद्यार्थ्यांचे शुभहस्ते रंगमंच पुजन करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे यांचा स्नेहवस्र, श्रीफळ, गुलाबपुष्प देवून सन्मान केला. याप्रसंगी प्रमुख अतिथी श्री. घोडके पुढे म्हणाले, सिताराम पाटील थोरात विद्यालयाला उज्वल भविष्य असून निसर्गाच्या सानिध्यात येथे शिक्षण घेणारे विद्यार्थीं जीवनात यशस्वी वाटचाल करतील.असे सांगितले.याप्रसंगी विश्वस्त प्रथमेश थोरात,प्राचार्य सौ.सुनिता दिवटे, सौ.शितल जाधव,सौ.ऐश्वर्या तुपे, श्रीम. सुवर्णा गडाख, श्रीम.हिराबाई कुंजीर, सुदर्शन काळे,व्यवस्थापक सुरेश बढे, रामेश्वर बढ़े, गायत्री बढे, मंगल बढे यांनी विशेष परिश्रम घेतले.उपस्थितांचे स्वागत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजय थोरात, प्रास्ताविक सौ. सुनिता दिवटे तर सुत्रसंचालन सौ. शितल जाधव यांनी करत आभार सुवर्णा गडाख यांनी मानले.शालेय विद्यार्थ्यांनी विविध गीतांवर ताल धरत उत्तम नृत्य अविष्काराचे सादरीकरण केले.रंगीबेरंगी वेशभूषा परिधान केलेली चिमुकली मुले सर्वांचेच लक्ष वेधून घेत होती. कार्यक्रमाचा पालक आणि ग्रामस्थांनी शेवटपर्यंत थांबून मुलांचे कौतुक केले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे