कासलीच्या रस्त्यांना ना. आशुतोष काळेंनी अर्धा कोटी निधी देवून नागरिकांच्या दळणवळणाच्या अडचणी सोडविल्या
कासली येथे रस्ते कामाचे भूमिपूजन प्रसंगी ना. आशुतोष काळे व मान्यवर.
संपादक:- रवींद्र जगताप
कोपरगाव प्रतिनिधी :-कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील कासली ग्रामस्थांना आपला शेतमाल जवळच असलेल्या येवला, अंदरसूल येथे विक्रीसाठी घेवून जाण्यासाठी रस्त्याची असलेली अडचण ओळखून श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी कासलीतील रस्त्यांसाठी अर्धा कोटी निधी देवून नागरिकांच्या दळणवळणाच्या अडचणी कायमच्या सोडविल्या आहे. या रस्त्यांचे राजेंद्र मलिक घर ते बाबुराव मलिक घर रस्ता, कासली ते दहेगाव बोलका ग्रामा ७६ रस्ता, शिवाजी आहेर घर ते संजय भगुरे घर रस्ता डांबरीकरण कामाचे भूमिपूजन नुकतेच ना. आशुतोष काळे यांच्या हस्ते पार पडले.कासलीतून अंदरसूल, येवला येथे जाण्यासाठी मुख्य रस्ता नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी घेवून जातांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागत होता. पावसाळ्यात शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील चिखल तुडवत शाळेत जावे लागत होते. रुग्णांना दवाखान्यात उपचार घेवून जाण्यासाठी देखील रस्ते नसल्यामुळे नागरिकांना रस्त्यांची अतिशय अडचण होती. हि अडचण ओळखून ना. आशुतोष काळे यांनी कासलीच्या विविध रस्त्यांसाठी ५१ लक्ष रुपये निधी देवून या रस्त्यांचे भूमिपूजन पार पडले आहे.यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकरराव रोहोम, कारभारी आगवन, सांडूभाई पठाण, डॉ. कृष्णा मलिक, सुनील मलिक, प्रभाकर मलिक, भानुदास मांडवडे, दत्तात्रय मलिक, प्रकाश मलिक, लक्ष्मण मलिक, दिपक भगुरे, तुकाराम भगुरे, संजय भगुरे, भागवत मलिक, सुभाष भगुरे, गोविंदराव मलिक, योगेश भगुरे, देवराम हेगडमल, महेश भगुरे, अशोक जमधडे, कैलास भगुरे, किरण नवले, राजेंद्र नवले, भगवान मलिक, चंद्रभान सुंभे, किरण मलिक, भगवान सुंभे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे दहिफळे, गाडे, पंचायत समिती अभियंता सी.डी. लाटे, ग्रामसेवक सुधाकर पगारे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.



