महाराष्ट्र

खासदार सदाशिव लोखंडे यांची वनश्री पुरस्कार सन्मानित सुशांत घोडके यांना सदिच्छा भेट…

खासदार सदाशिव लोखंडे यांची वनश्री पुरस्कार सन्मानित सुशांत घोडके यांना सदिच्छा भेट…

निर्माल्य संकलन वाहन व ईतर सार्वजनिक विषयावर चर्चा

शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे हे कोपरगांव येथे शासन आपल्या दारी या कार्यक्रमानिमित्त आले असता त्यांनी महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार सन्मानित सुशांत घोडके यांची सदिच्छा भेट घेतली.या प्रसंगी वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. माजी सैनिक संघटनेचे उपाध्यक्ष,निवृत्त सैनिक अधिकारी मारुती कोपरे, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार सन्मानित दिलीप घोडके, प्रगतशील शेतकरी मंदार आढाव,क्रीडा शिक्षक शिवप्रसाद घोडके,दिलीप गायकवाड,शिवसेना जिल्हा प्रमुख कमलाकर कोते,उपजिल्हाध्यक्ष मनिल नरोडे, तालुकाध्यक्ष रावसाहेब थोरात, देवा लोखंडे, उपशहरप्रमुख संदिप डुंबरे, ग्राहक केंद्राचे अनिल पवार, प्रकाश खडांगळे यांचे सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी सूर्यतेज संस्थापक व स्वच्छतादूत सुशांत घोडके यांनी उपस्थितांचे स्नेहवस्र,सन्मानचिन्ह आणि गुलाबपुष्प देवून स्वागत केले.या प्रसंगी स्वच्छतादूत सुशांत घोडके यांनी, स्वच्छ भारत अभियान अंतर्गत निर्माल्य संकलनासाठी स्वतंत्र वाहन व्यवस्था बाबतीत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली असल्याचे सांगत सदर प्रक्रिया जलद गतीने होणेबाबत सांगितले.माजी सैनिक संघटनेचे उपाध्यक्ष,निवृत्त सैनिक अधिकारी मारुती कोपरे यांनी सद्यस्थितीत केंद्रीय पातळीवर पेन्शन बाबतीत विसंगती संदर्भात शासन दरबारी तारांकित प्रश्न मांडणे कामी निवेदन दिले. तसेच माजी सैनिकांच्या महसूल सह विविध शासकीय कार्यालयात प्रलंबित असलेली प्रकरणे संदर्भात सांगितले. यावर खासदार सदाशिव लोखंडे यांनी स्वतंत्रपणे माजी सैनिकाची बैठक घेण्याचे आश्वस्त केले.

प्रगतशील शेतकरी मंदार आढाव यांनी शेतातून जाणाऱ्या वीजप्रवाहीत तारा तुटण्याचे प्रमाण वाढत असल्याचे सांगत. स्पार्किंगमुळे उस,पिके,फळबागा यांचे होणारे शेतक-यांचे नुकसान बद्दल सांगितले. यावर खासदार सदाशिव लोखंडे यांनी वीज वितरण अभियंता यांना विचारणा करुन समस्या सोडविण्यासाठी लक्ष घालण्याचे सांगितले.शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार सन्मानित दिलीप घोडके यांनी क्रीडा क्षेत्रातील हाॅलीबाॅल,तलवारबाजी या सह विविध क्रीडा क्षेत्राबाबत साहित्य,सुविधा विषयी सांगितले.क्रीडा क्षेत्रा संदर्भात निवेदन सादर केले.याप्रसंगी खासदार सदाशिव लोखंडे यांनी शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार सन्मानित दिलीप घोडके,माजी सैनिक संघटनेचे उपाध्यक्ष मारुती कोपरे यांचा शाल, पुष्पगुच्छ देवून त्यांचा कार्याचा गौरव केला.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे