महाराष्ट्र

कै. सौ. शकुंतलाताई भिमराज जाधव यांचा शुक्रवार दि. २८ मार्च २०२५ रोजी दशक्रिया विधी

 

कै. सौ. शकुंतलाताई भिमराज जाधव यांचा शुक्रवार दि. २८ मार्च २०२५ रोजी दशक्रिया विधी

गायनाचार्य ह.भ.प. भिमराज महाराज जाधव यांच्या पत्नी कै. सौ. शकुंतलाताई भिमराज जाधव यांना बुधवार दि. १९ मार्च २०२५ रोजी दुपारी ३.०० वा. देवाज्ञा झाली त्यांचा दशक्रिया विधी शुक्रवार दि. २८ मार्च २०२५ रोजी सकाळी ९.०० वा. अमरधाम, कोपरगाव येथे होईल अशी माहिती जाधव परिवाराचे वतीने दिली आहे.सदरप्रसंगी जेऊर पाटोदा येथील माऊली आश्रमाचे ह.भ.प. नवनाथ महाराज खेडकर यांचे प्रवचन होणार असून भोजन व्यवस्था श्री संतसेना नाभिक समाज वसतिगृह, कोपरगाव येथे केली आहे.
कै. सौ. शकुंतलाताई जाधव यांनी लक्ष्मीनगर येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात २५ वर्षे सेवा दिली. काकडा, भजन यासह विविध धार्मिक कार्यात त्यांचा नियमित सहभाग असायचा.गायनाचार्य ह.भ.प. भिमराज महाराज जाधव यांच्या त्या पत्नी होत्या. त्यांचे पश्चात दीर सुर्यकांत गोपीनाथ जाधव,दिलीप भावराव जाधव, मुलगा मुकुंद भिमराज जाधव (संचालक, श्री संतसेना महाराज मंदिर ट्रस्ट, कोपरगांव), मुलगा ह.भ.प. संतोष भिमराज जाधव (साई संगीतमय कथाकार तथा पत्रकार), मुलगी सौ. छाया सुदाम कोरडे, मुलगी सौ. अनिता सोमनाथ वाघ,सुन श्रीमती योगिता दादासाहेब जाधव, सौ.अर्चना मुकुंद जाधव, सौ. वैशाली संतोष जाधव,नातू परेश दादासाहेब जाधव, चैतन्य संतोष जाधव, सोहम मुकुंद जाधव, नात कु.चंचल संतोष जाधव, कु. किर्ती दादासाहेब जाधव, नात कु. श्रध्दा मुकुंद जाधव असा जाधव, शिंदे, कोरडे, वाघ, गायकवाड परिवार आहे.

कै. सौ. शकुंतलाताई भिमराज जाधव यांना भावपुर्ण श्रध्दांजली…

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे