आरोग्य व शिक्षण

जि.प.प्रा.शाळेत चिमुकल्याच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या……

संपादक :- रवींद्र जगताप

सावळीविहीर /-जि.प.प्रा.शाळा सावळी विहीर फार्म ता.राहाता येथिल शिक्षक बाळासाहेब नाना लावरे सर याची मुख्याध्यापक पदी पदोन्नती झाली हि वार्ता चिमुकल्यांच्या कानी पडली याचा अर्थ. समजुन घेताच चिमुकल्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या सर नका जाऊ असे शब्द उच्चारताना काही काळ शांततामय वातावरण निर्माण झाले लावरे सर हे सावळीविहीर खुर्द जी.आर.बी.वाडी शाळेत गेल्या.दहा वर्षांपासून ज्ञानदानाचे काम प्रामाणिकपणे करत होते तसेच कोपरगाव तालुक्यात कुंभारी या ठिकाणी ज्ञानदानाचे कर्तव्य पार पाडले आहे सावळी विहीर फार्म याठिकाणी हजर होऊन चार वर्षाचा कार्यकाळ झाला आहे या काळात चिमुकल्यांना हसतखेळत शिक्षणाची आवड निर्माण व्हावी यासाठी नेहमी प्रयत्नशील असतं मुलांना धार्मिक सांस्कृतिक सामाजिक विज्ञान याबाबत नेहमी मार्गदर्शन करत लावरे संर यांना जि.प.चा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे तसेच किलबिल गाणी ह्या काव्यसंग्रहाच्या पसंतीचे  मानकरी ठरले लेखन साहित्याचे अनेक पुरस्कार देखील सरांना मिळाले आहे महाराष्ट्र पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ शासकीय नोंद आहे .कोरोना महामारी काळात वाडीवस्तीवर जाऊन मुलांना व पालकांना मार्गदर्शन केले.गरजु विद्यार्थ्यांना शालेय साहित्य उपलब्ध करुन दिले आहे. कोपरगाव व राहाता तालुक्यात संराचा मोठा जनसंपर्क आहे सरांना मुख्याध्यापक पदी पदोन्नतीची बातमी समजताच अभिनंदन व शुभेच्छा देण्यासाठी ग्रामस्थांनी व  पालकांनी छोटेखाणी कार्यक्रमात सत्काराचे आयोजन केले चिमुकल्यानी सामुदायिक अल्पोपहारचा आनंद घेतला. याप्रसंगी उपस्थित.सरपंच अशोकराव जमधडे,  ग्रामसेवकी टेंमक पी.जे  राजेंद्र जमधडे, पत्रकार किशोर पाटणी, विजय खरात, राहुल कोळगे, सुंदर वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते आप्पासाहेब चव्हाण, साईनाथ झिंझाड, महेश जमधडे, अंगणवाडी सेविका शेख ताई, भारत मुसळे, गुंजाळ,शिरसागर, सुरळे ताई, देवकर ताई, आदी मान्यवर सह पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .कार्यक्रमाच्या शेवटी अभार योगेश  बोरसे सरांनी मानले

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे