त्या टपरीधारकांचे पुनवर्सन करुन त्यांना व्यवसायासाठी परवानगी द्यावी :- नितिन बनसोडे
त्या टपरीधारकांचे पुनवर्सन करुन त्यांना व्यवसायासाठी परवानगी द्यावी :- नितिन बनसोडे
संपादक:- रविंद्र जगताप
नुकतेच धारणगांवरोड वरील टपर्या हटवून अतिक्रमण काढण्यात आले असून सदर याठिकाणी अनेक वर्षापासून गोर गरीब व्यवसायिक आपला उदरनिर्वाह करत आहे.या महागाईच्या जमान्यात व्यावसायिकांचा पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झालेला असून आज त्यांचेवर उपासमारीची वेळ आलेली आहे.तरी कोपरगांव नगरपरिषद प्रशासनाने सदर व्यावसायिकांना त्या जागेवर व्यवसाय करण्याची परवानगी देवून पूनर्वसन करण्यात यावे. अन्यथा वंचित बहुजन आघाडी कडून तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल. याची सर्वस्वी जबाबदारी नगरपालिका प्रशासनाची राहील.असे निवेदन वंचित बहुजन आघाडीच्या वतिने कोपरगाव नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी ज्ञानेश्वर चाकणे यांना देण्यात आले आहे.याप्रसंगी वंचितचे कोपरगाव तालुका अध्यक्ष नितिन बनसोडे, ,महासचिव गौतम बनसोडे,सचिव शकील चोपदार,शहराध्यक्ष शुभम शिंदे,कोपरगाव युवा शहराध्यक्ष शकील तांबोळी यांच्या निवेदनावर स्वाक्षर्या आहेत तसेच यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या कोपरगाव शहर कार्यकारिणीची घोषणा नितीन बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज करण्यात आली यामध्ये कोपरगाव तालुका उपाध्यक्षपदी अनिल राजेंद्र कांबळे तसेच रतन रामकरण भारती राजेंद्र हनुमंत पगारे व सुरेश भीमराज हुसळे यांची निवड करण्यात आली असून कोपरगाव तालुका संघटक पदी महेंद्र अर्जुन साळवे व बापूसाहेब बाजीराव ठोंबरे तसेच अशोक रामदास सौदागर व विकास साहेबराव लोंढे यांची निवड करण्यात आली तर तालुका सचिव पदी राजेंद्र भाऊराव पगारे यांची निवड करण्यात आली तसेच सल्लागार पदी दत्तू सखाराम घोडेराव भाऊसाहेब महादू वाकचौरे यांची निवड करण्यात आली आहे त्याचबरोबर कोपरगाव शहर अध्यक्षपदी शुभम साहेबराव शिंदे तर उपाध्यक्षपदी कैलास अर्जुन कुऱ्हाडे व मुकेश कचरू शिंदे यांची निवड करण्यात आली आहे तर कोपरगाव वंचित बहुजन आघाडीच्या युवा आघाडी शहर अध्यक्षपदी शकील गफूर भाई तांबोळी यांची निवड करण्यात आली या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे कोपरगाव तालुका अध्यक्ष नितीन बनसोडे महाराष्ट्र राज्य संघटक शरद खरात तसेच उपजिल्हा कार्यकारणी सदस्य अनिल बनसोडे यांनी आपल्या पक्षाच्या नावातील “वंचित” आणि “बहुजन” घटकांना सामावून घेण्याचा प्रयत्न कोपरगाव तालुका व शहर कार्यकारणी करतांना नितीन बनसोडे यांनी केला तसेच पक्ष संघटन अधिक बळकट करण्यासाठी ही नवीन कार्यकारणी विश्वासू कार्यकर्त्यांना सोबत घेऊन त्यांच्यावर तालुका व शहर पदांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.या नवीन कार्यकारिणीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.



