महाराष्ट्र

“शिर्डी मतदार संघाच्या विकासासाठी उमेदवारी करायची”- ऍड. नितीन पोळ

“शिर्डी मतदार संघाच्या विकासासाठी उमेदवारी करायची”- ऍड. नितीन पोळ

लोक सभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले युती आघाडाचे उमेदवार जाहीर झाले आर्थिक दृष्ट्या सक्षम असल्याने तिकिटे विकत घेतली मात्र मतदारांमध्ये असलेली नाराजी हे उमेदवार विकत घेऊ शकत नाहीत मागील पंधरा वर्षे आपण सर्वांनी हे दोन्ही उमेदवार अनुभवले त्यांच्या चांगल्या वाईट कामाचा लेखाजोखा आपणाला माहित आहेच, देशात सत्ता कोणाची येईल याही पेक्षा मतदार संघातील शेती, शेतकरी, शेतीच्या पाण्याचा, बेरोजगारीचा प्रश्न गंभीर आहे हे प्रश्न सोडवण्यात दोन्ही उमेदवार सत्ता मिळून अपयशी ठरले आहेत मात्र मी सातत्याने गेल्या अनेक वर्षांपासून शासन, प्रशासन यांच्या समोर सर्व सामान्य जनतेचे प्रश्न मांडत आहे व ते सोडवण्याचा प्रयत्न केला आहे हे आपण सर्व जण बघत आहात कोणतीही अभिलाषा न ठेवता पाणी रस्ते या बरोबरच अनेक नागरी समस्या केवळ निवेदन देऊन आंदोलन, मोर्चे, धरणे आंदोलन तसेच अनेक लक्षवेधी आंदोलन करून सोडवले असून सतत जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवत आहे. फक्त निवडणुकी पुरते मतदारांशी संपर्क करतो असे नाही कोणताही राजकीय वारसा,राजकीय सत्ता व आर्थिक मालमत्ता नसताना हे काम करत आहे

त्यामुळे आपले प्रश्न सोडवण्याचा ध्यास घेऊन आगामी लोक सभा निवडणूक आपल्या सर्वांच्या पाठबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे मी कायद्याचा पदवीधर असून शासन प्रशासन यांच्या कार्यपद्धती चा अनुभव आहे

माझ्या कडे तुमच्या पर्यंत पोहचायला कोणतीही यंत्रणा नाही तसेच गाड्या जेवणावळ द्यायला, बेकायदा धंद्यातून कमवलेली आर्थिक संपत्ती नाही मात्र तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने लढण्याची ताकद आहे त्यामुळे मी ही निवडणूक लढवत असून मला नक्की खात्री आहे तुम्ही ठरवले तर केवळ सतारा दिवसात एखाद्या उमेदवाराला संधी देऊन संसदेत पोहचवू शकतात मात्र तो उमेदवार तुमचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरला असेल तर त्यात तुमची चूक नाही मात्र आता हिच संधी आहे या निवडणुकीच्या निमित्ताने तुम्ही तुमच्या संपर्कातील व तुमच्या प्रश्नांची जाण असणाऱ्या सर्व सामान्य व एका लढवू उमेदवाराला मत द्या तुमच्या छोट्या छोट्या प्रश्नावर आंदोलन करण्याची वेळ येणार नाही हा विश्वास देतो

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे