राजकिय

“विखे पाटील यांनी आमची पण गॅरंटी घ्यावी म्हणून शिष्टमंडळ भेटणार” – ॲड. नितीन पोळ

“विखे पाटील यांनी आमची पण गॅरंटी घ्यावी म्हणून शिष्टमंडळ भेटणार” – ॲड. नितीन पोळ

कोपरगाव;-मागील महिन्यात कोपरगाव तालुक्यात विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आगामी निवडणुकीत आमदार व नगर पालिकेच्या निवडणुकीत उमेदवार निवडून आणायची गॅरंटी घेतली असून आगामी लोक सभेच्या निवडणुकीत मातंग समाजाचा उमेदवार निवडून आणण्याची  गॅरंटी घ्यावी म्हणून लवकरच शिष्टमंडळ भेटणार आहे सण २००९ साली शिर्डी लोक सभा मतदासंघ अनुसूचित जाती करीता राखीव करण्यात आला.मात्र शिर्डी लोकसभा मतदार संघात अनुसूचित जातीच्या लोक संख्येच्या दृष्टीने मातंग दोन नंबर वर आहे. मात्र अद्याप या मतदासंघातून मातंग समाजाच्या उमेदवाराला संधी मिळाली नाही

जाहिरात

मागील चार पाच महिन्या पासुन मातंग समाजातील विविध सामाजिक व राजकिय पदाधिकारी यांनी संपूर्ण मतदार संघांत भेटी गाठी घेऊन उमेदवारी मिळावी म्हणून तयारी केली असून मागील काही दिवसां पुर्वी कोपरगाव तालुक्यात आगामी विधान सभा व नगर पालिकेत सत्ता मिळवण्याची आणि उमेदवार निवडून आणण्याची गॅरंटी घेतली आहे तशीच लोक सभा निवडणूकी मध्ये मातंग समाजाच्या उमेदवाराला उमेदवारी देण्याची व निवडून आणण्याची जबाबदारी घ्यावी अशी मागणी शिष्टमंडळ भेटून मागणी करणार आहे

गेल्या सहा महिन्यांपासून मातंग समाजातील विविध सामाजिक व राजकीय पक्षातील पदाधिकारी एकत्र येऊन मोर्चे बांधणी केली आहे त्यांनी शिर्डी लोकसभा मतदार संघातील सर्वच विधान सभा मतदासंघांत जाऊन भेटीगाठी घेतल्या असून राजकीय व सामाजिक परिस्थिती मातंग समाजाला अनुकूल आहे त्यामूळे यावेळी आग्र हक्काने मातंग समाजातील उमेदवार निवडून येईल असे वातावरण तयार झाले आहे त्यामूळे आगामी लोक सभा निवडणुकीत ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी मातंग समाजातील व्यक्तीस उमेदवारी मिळवून द्यावी व तो उमेदवार निवडून आणण्यासाठी गॅरंटी घ्यावी म्हणून लवकरच एक शिष्टमंडळ ना विखे पाटील यांना भेटून मागणी करणार आहे

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे