भारतीय संस्कृतीत दिवाळी सणाला फार महत्व आहे:- शरद त्रिभुवन
भारतीय संस्कृतीत दिवाळी सणाला फार महत्व आहे:- शरद त्रिभुवन
भारतात दिवाळी या सणाला खूप महत्त्व असून त्यातच केरसुणी लक्ष्मी सिंधीचा झाडाची झाडू शिवाय लक्ष्मीपूजन पूर्ण होत नाही. म्हणून ही लक्ष्मीपूजलीच गेली पाहिजे तरच घरामध्ये लक्ष्मीचा वास असतो गेल्यावर्षी घेतलेली लक्ष्मी ही पुढच्या दिवाळीपर्यंत घरात ठेवू नये.*
*कारण जी केरसुणी लक्ष्मी आपण सध्या घरात वापरत असलेली ती लक्ष्मी आपल्या घरातील दारिद्र व दुःख पुढच्या दिवाळी अर्थात अमावस्येला घेऊन जाते.*
*म्हणून नव्याने केरसुणी लक्ष्मी खरेदी करून पूजन केले जाते. काही बांधव भगिनी गेल्यावर्षी आणलेली केरसुणी लक्ष्मी तिचा वापर होत नसल्यामुळे ती तशीच झाकून व जपुन ठेवतात हे अत्यंत चुकीचा असून गेल्या वर्षीची असलेली केरसुणी लक्ष्मी ती घरात ठेवू नये.*
*मातंग ऋषी यांना महालक्ष्मी देवीने सांगितले आहे अशी तिची कथा आहे ती कथा पुढील प्रमाणे आहे भगवान मातंग ऋषी तपाला बसलेले होते.*
*मातंग ऋषीची तपच्यार्या बघून महालक्ष्मी ने त्यांची परीक्षा घ्यायची ठरवले पण मातंग ऋषीकडे दान मागावे तरी काय काही प्रश्न पडला मग त्यांना एक कल्पना सुचली अंगण झाडण्यासाठी केरसुणी मागून घेऊया ती पण शिंदीच्या झाडापासून बनवलेली
मातंग ऋषी या परिक्षेत जर पास झाले.
तरच मी त्यांना वरदान देईल बारा महिने सिंधीचे झाड शोधत राहिले पण सिंधीचे झाड जवळ असुनही अनेक ठिकाणी भटकंती करावी लागली तरी ते झाड सापडले नाही मातंग ऋषी पुन्हा त्यांच्या कुटी कडे वैतागून आले.
महालक्ष्मी देवीने मागीतले दान जर मी देऊ शकलो नाही तर काय अनर्थ होईल सांगता येणार नाही या चक्रात सापडले जवळ अंगनात असुनही लक्षात येईना सिंधीचे झाड. रात्र झाली ते विचार करत झोपी गेले व ब्रह्मदेवाने स्वप्नात येऊन सांगितले की तुझ्याच अंगनात सिंधीचे झाड आहे तेव्हा ते मातंग ऋषी धाडकन उठले त्या झाडाला नमस्कार करून फडे कापायला सुरवात केली ते उन्हात वाळवुन झटकून त्याची केरसुणी लक्ष्मी तयार केली व महालक्ष्मी देऊ केली देवी प्रसन्न झाली लक्ष्मीने वरदान मागायला सांगितले मातंग ऋषी ने असे वरदान मागीतले की दरवर्षी ह्या केरसुणी ला लक्ष्मीचे रुप मानुन प्रत्येक घरात पुजली जावी हाच आशिर्वाद द्यावा महालक्ष्मीने वरदान दिले की दर दिवाळी या महत्त्वाच्या सनाला लक्ष्मीचे रुप मानुन पुजलेले जाईल तसेच ही केरसुणी लक्ष्मी ज्या घरात पुजली जाईल 12 महिने या लक्ष्मीचा वापर घर अंगन झाडले जाईल त्या घरची दारिद्र दु:ख दिवाळी अमावस्याला घेऊन जाईल.ज्या घरात नवीन केरसुणी लक्ष्मी आणली जाईल त्याच घरात सुखसमृद्धी नांदेल..
अशी ही कथा असुन…

टिप : सध्याच्या फॅशन जमान्यात लांबलचक प्लास्टिक झाडूचा जमाना आला पण सिंधीच्या झाडापासून खरी लक्ष्मी केरसुणी लोप पावत चालली मातंग ऋषी यांनी बांधलेली लक्ष्मी केरसुणीच पुजली जावी बाकी आपली मर्जी धन्यवाद
जेव्हा मांगाने केरसुणी बांधली तेव्हा तुमच्या घरात लक्ष्मी नांदली या गाण्याचा हा अर्थच अजुन आपल्या बांधवांना समजलेला नाही दुर्दैव म्हणावे लागेल जुन्या जाणत्या लोकांकडून ही कथा ऐकण्यात आली जशी त्यांनी सांगितली तशीच माहिती आपणास माझ्या शब्दात लिहिली… धन्यवाद
शब्दलेखन
सामाजिक कार्यकर्ते शरद छबु ञिभुवन


