सामाजिक

शब्दगंध साहित्यिक परिषदेचे वाड्मय पुरस्कार समारोह संपन्न

शब्दगंध साहित्यिक परिषदेचे वाड्मय पुरस्कार समारोह संपन्न

संंपादक रवींद्र जगताप

कोपरगाव प्रतिनिधी :-गेल्या दोन वर्षांपासून असलेली  कोरोना आजाराची साथ यामुळे जनजीवन सगळे विस्कळीत झाले होते.एकत्र येण्यास बंधने आली होती. त्यामुळे शब्दगंध  साहित्य संमेलन घेता आले नाही. मात्र शब्दगंधचे साहित्यिक उपक्रम  काही थांबले नाहीत. ऑनलाईन एकत्र येऊन कविसंमेलन, चर्चासत्र हे चालूच होते आणि साहित्यिकांचा  त्याला भरघोस प्रतिसाद ही मिळत होता. आता  कोरोना साथ संपल्यावर साहित्य संमेलन  घेता येईल या दृष्टीने पूर्वतयारी साठी वेगवेगळे साहित्य प्रकारातील  वाड्मय स्पर्धेसाठी  बोलावले होते. गेल्या दोन वर्षांपासून हे साहित्य बोलावून परिक्षकामार्फत तपासून निकाल ही तयार करण्यात आले होते. या वर्षी कोरोना साथ ओसरते असे वाटू लागल्याने  साहित्य संमेलन घ्यावे अशा निर्णयापर्यंत कार्यकारी मंडळ आले आहे.तरीही पुन्हा कोरोनाची चौथी लाट येते की काय असे वाटल्याने संमेलन होईल तेंव्हा होईल परंतु दोन वर्षांची वाङमयीन पुरस्कार वितरण घेऊ असे ठरले. सर्व वाङमयीन पुरस्काराची घोषणा शब्दगंध साहित्यिक परिषदेचे अध्यक्ष श्री.राजेंद्र उदागे, सचिव सुनील गोसावी यांनी  पुरस्कारप्राप्त साहित्यिकांना निवडपत्र पाठवून तसेच  वर्तमानपत्रे, न्यूज चॅनेलद्वारे , व्हाट्स अप, फेसबुकद्वारे प्रसिद्धी देऊन केली. आणि दि. 11 जून 2022 रोजी दुपारी  अहमदनगर येथे कोहिनुर मंगल कार्यालयात दिमाखदार असा हा वाङमयीन पुरस्कार सोहळा अहमदनगर शहराचे आमदार श्री. संग्रामभैय्या जगताप, साहित्यिक डॉ.संजय कळमकर, उपजिल्हधिकारी श्री.गणेश मरकड, श्री.ज्ञानदेव पांडुळे मामा, श्री.चंद्रकांत पालवे, श्री. राजेंद्र उदागे,भाऊसाहेब सावंत, श्री.लेवीन भोसले, व सुनील गोसावी यांच्या उपस्थितीत व हस्ते  2019 व 2020 मधील  साहित्यिकांच्या साहित्याला पुरस्कार प्रदान करण्यात आले ते पुढीलप्रमाणे:

*2019 चे राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार*

१) विळखा- दशरथ चौरे, अहमदनगर.

२) मुनादी- मांगीलाल राठोड,बुलढाणा.

३) हे बंध रेशमाचे- श्री.बबन धुमाळ दौड.

४) अबोल अश्रू- प्रा.डॉ.गिरीश खारकर, अमरावती.

५) कृतार्थता- डॉ.अशोक ढगे, नेवासा.

६) जीवन संघर्ष- श्री.भानुदास आहेर, अहमदनगर.

७) उलगडलेल्या नव्या उजेडवाटा- श्री.एकनाथ खिल्लारे, औरंगाबाद.

८) कुंकू ते दुनियादारी- प्रा. डॉ. राजेंद्र थोरात, पुणे.

९) विजेता- उमेश घेवरीकर, शेवगांव.

१०) काव्यश्रुती- कु. श्रुती गालफाडे, लातूर.

११) आभाळमाया-  कु. अस्मिता मराठे, लाडजळगांव.

*2020  चे राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार*-

१) लॉकडाऊन- श्री. ज्ञानेश्वर जाधवर, बार्शी.

२) ऋतुमितवा- तनुजा ढेरे, ठाणे.

३) शेते कापणीसाठी पांढरी झाली- श्री. विनोद शिंदे अहमदनगर.

४) रिंगण- सॊ. माधुरी मरकड

५) रातराणी- श्री. राघव/पोपट वाबळे, बारामती.

६) गावकुसातल्या गोष्टी- डॉ.शिवाजी काळे, श्रीरामपूर.

७) मनात राहणारे- श्री.शशिकांत शिंदे, कोल्हार.

८) बाप नावाची माय- डॉ. राजेश गायकवाड, परभणी.

९) खानदेश भिल्ल, आदिवासी आंबेडकरी चळवळ- सुनीता सावरकर, औरंगाबाद.

१०) सतारीच्या तारा- अँथनी परेरा, वसई.

११) हसरी फुले- डॉ.शुभांगी गादेगांवकर, ठाणे.

१२) स्वातंत्र्य संग्रामातील सुवर्णरत्ने- श्री. रघुनाथ मेटकरी, विटा.

                 या पुरस्कार सोहळ्याप्रसंगी आ.संग्रामभैय्या जगताप म्हणाले की, शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने अहमदनगर शहरात गेल्या 15  वर्षापासून भव्य दिव्य असे  साहित्य संमेलन भरविले जात आहे. यामुळे शहराला एक साहित्यिक नगरी म्हणून मानाचे स्थान मिळाले आहे. गेल्या सात संमेलनापासून मी याचा साक्षीदार आहे.यामुळे आमची वाचनाची गोडी वाढली आहे.आमच्या साहित्यिक ज्ञानात भर पडली आहे. तर साहित्यिक डॉ. संजय कळमकर यांनी आपल्या विनोदी शैलीने साहित्याचे वेगवेगळे प्रकाराने त्या त्या काळात वाचकवर्ग कसा खिळवून ठेवला हे सांगून  साहित्यिकांची मने जिंकली. ग्रामीण साहित्यिक सरपंच भाऊसाहेब सावंत यांनी पुरोगामी साहित्य व मनुवादी साहित्य याबाबत विश्लेषण केले. 

                       पुरस्कार्थीच्या वतीने प्राचार्य डॉ.राजेंद्र थोरात यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर कु. अस्मिता मराठे हिच्या कवितेने मला दिला गेलेला पुरस्कार कसा सार्थ आहे हे पटवून दिले.यावेळी भगवान राऊत हे स्टेट को ऑर्डीनेटर असलेल्या “बाई माणूस” या यु ट्यूब चॅनलचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमास साहित्यक प्रा.डॉ.बाबुराव उपाध्ये,शब्दगंधचे माजी अध्यक्ष प्रा.डॉ.शंकर चव्हाण, प्रा.डॉ.गुंफा कोकाटे, प्रा.मधुसूदन मुळे, अभिनव खानदेशचे संपादक श्री.प्रभाकर सूर्यवंशी, राजेंद्र पवार इ. मान्यवर उपस्थित होते.या पुरस्कार सोहळ्याचे सुत्रसंचलन  कवियत्री शर्मिला गोसावी यांनी केले. अध्यक्षीय निवड प्रा.डॉ.अशोक कानडे, तर अनुमोदन राजेंद्र फंड यांनी दिले. शेवटी आभार सुभाष सोनवणे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भगवान राऊत, बबनराव गिरी सर, किशोर डोंगरे, सुनील धस, हरिभाउ नजन,प्रशांत वाघ, आर.आर.माने, प्रमोद येवले, शहाराम आगळे, दिशा गोसावी, हर्षाली गिरी, भाग्यश्री राऊत, निखिल गिरी, ऋषिकेश राऊत, स्वाती ठुबे, शर्मिला रणधीर, जयश्री राऊत, जयश्री झरेकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले .

                  

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे