ब्रेकिंग

‘जगणं सुंदर आहे’ या विषयावर प्रेरणादायी व्याख्यान; विविध क्षेत्रातील मान्यवरांना ज्ञानसागर स्मृती मानवसेवा व ज्ञानसागर स्मृती  गुणगौरव पुरस्कार

 

‘जगणं सुंदर आहे’ या विषयावर प्रेरणादायी व्याख्यान; विविध क्षेत्रातील मान्यवरांना ज्ञानसागर स्मृती मानवसेवा व ज्ञानसागर स्मृती  गुणगौरव पुरस्कार

कोपरगाव, प्रतिनिधी : ज्ञानसागर स्वर्गीय सागर राजू जाधव स्मृती प्रतिष्ठान, रचना पार्क, कोपरगाव यांच्या वतीने गुरुवार दि. 18 जून 2026 रोजी दुपारी 3 वाजता “जगणं सुंदर आहे” या विषयावर प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रम, भक्तनिवास क्र. 2, नगर-मनमाड रोड, कोपरगाव येथे संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमासाठी रायगड येथील ख्यातनाम शिवव्याख्याते प्रशांत देशमुख यांना प्रमुख वक्ते म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. जीवनातील सकारात्मकता, संघर्षातून यशाचा मार्ग आणि समाजासाठी प्रेरणादायी विचार यावर ते मार्गदर्शन करणार आहेत.याच प्रसंगी ज्ञानसागर स्मृती मानवसेवा पुरस्कार तसेच ज्ञानसागर स्मृती गुणगौरव पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

ज्ञानसागर स्मृती मानव सेवा पुरस्काराने संत सद्गुरू स्वामी वासुदेवानंदगिरीजी बहुरूपी महाराज, संत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज अनाथ आश्रम, वृद्धाश्रम व गोशाळा, लासलगाव यांचा गौरव करण्यात येणार आहे. तसेच स्नेहवन संस्था, आळंदी (पुणे)चे अध्यक्ष अशोक देशमाने सर यांनाही मानव सेवा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.ज्ञानसागर स्मृती  गुणगौरव पुरस्कारासाठी विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये श्रीमद्भगवद्गीता कंठस्थ करणारे विद्यार्थी स्वप्निल सतीश पाठक (इयत्ता तिसरी) व सान्वी सतीश पाठक (इयत्ता चौथी), बार्शी (सोलापूर) यांचा समावेश आहे.तसेच बाल मृदंगाचार्य ह.भ.प. शुक ज्ञानेश्वर चाळक (चव्हाणवाडी, ता. शिरूर, जि. पुणे), मराठी चित्रपटातील पार्श्वगायक माऊली वारकरी शिक्षण संस्था अनाथालय व गोशाळा लिल्लोड फाटा ह.भ.प. रोहित महाराज जाधव , संत सद्गुरु जनार्दन स्वामी अनाथ व वृद्धाश्रम गोशाळा लासलगाव येथील इंटरनँशनल गोल्ड मेडल विजेती स्केटिंगपटू कु. दुर्गा दिलीप गुंजाळ, भारतीय नौदलात लेफ्टनंट पदावर नियुक्त झालेली कु. आकांक्षा विक्रम भास्कर (खिर्डी गणेश, कोपरगाव), राष्ट्रीय स्तरावरील रग्बी स्पर्धेत रौप्यपदक विजेते केजरा उत्तम शिवराम (दिल्ली), आत्मामालिक गुरुकुल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम, कोकमठाण, ज्येष्ठ चित्रकार शिल्पकार मूर्तिकार संस्थापक प्रगत कला महाविद्यालय अहिल्यानगर प्रमोद दत्तात्रय कांबळे तसेच ज्येष्ठ पत्रकार सतीश वैजापूरकर (दैनिक सकाळ व भूमिपुत्र, शिर्डी) यांना गुणगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.हा पुरस्कार वितरण सोहळा परमपूज्य महंत रमेशगिरीजी महाराज, मठाधिपती राष्ट्रसंत जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज, बेट कोपरगाव तसेच परमपूज्य संत परमानंद महाराज, आत्मामालिक ज्ञानपीठ, कोकमठाण यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.कार्यक्रमास आमदार विवेक भैय्या कोल्हे,  मंगेश माधवराव पाटील, माजी नगराध्यक्ष ,  कोपरगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पराग संधान,  प्रा. डॉ. अनिल खर्चे, पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, मलकापूर, प्नशांत शांताराम देशमुख शिवव्याख्याते हातनोली खालापुर रायगड आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.या प्रेरणादायी व गौरवपूर्ण कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी केले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे