ब्रेकिंग

एस.एस.जी.एम महाविद्यालयात पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण अकॅडमीचे उद्घाटन

एस.एस.जी.एम महाविद्यालयात पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण अकॅडमीचे उद्घाटन

कोपरगाव, दि. २३ जून २०२६ ग्रामीण व शहरी भागातील युवक युवतींना पोलीस दलात करिअरची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने श्री सद्‌गुरु गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज, कोपरगाव येथे पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण अकॅडमीचे उ‌द्घाटन सोमवार, दि. २२ जून २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता आयोजित करण्यात येणार आहे.

 

  या अकॅडमीचे उद्घाटन प्रमुख पाहुणे तथा शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी मा. श्री.अमोल भारती साहेब यांच्या हस्ते होणार आहे. रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य तथा महाविद्यालयीन विकास समितीचे चेअरमन मा. अॅड. संदीप वर्पे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून कोपरगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक मा. श्री. संभाजी गायकवाड, कोपरगाव शहरचे पोलीस निरीक्षक मा. श्री. उद्धव डमाळे, रयत शिक्षण संस्थेचे व्हा. चेअरमन मा. अॅड. भगीरथ (काका) शिंदे, मा. आमदार रोहित पवार, मा. आमदार विवेक कोल्हे, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य श्री. सुरेश बोळीज, महाविद्यालयीन विकास समितीचे सदस्य मा. सौ. चैतालीताई काळे, मा. श्री. सुनील गंगुले तसेच निमंत्रित सदस्य मा. श्री. महेंद्रशेठ काळे, डॉ. ज्ञानेश्वर वाकचौरे, श्री. बाळासाहेब आव्हाड यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

ज्योती पतसंस्था

     यावेळी श्री. सुदाम शेळके (ज्ञानदा अकॅडमी, सिन्नर), श्री. सागर खालकर (एस. के. फिटनेस अकॅडमी, संगमनेर), श्री. साईनाथ वर्पे (आत्मा मालिक भरतीपूर्व प्रशिक्षण अकॅडमी), श्री. साजन चव्हाण, भरतीपूर्व प्रशिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ प्रशिक्षक उपस्थित राहून वि‌द्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. महावि‌द्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेली ही अकॅडमी ग्रामीण व शहरी भागातील कनिष्ठ आणि वरिष्ठ विभागामध्ये शिक्षण घेणाऱ्या तसेच पोलीस दलात भरती होण्याची इच्छा असलेल्या युवक-युवतींसाठी सुवर्णसंधी ठरणार आहे. या अकॅडमीमध्ये पोलीस भरतीसाठी आवश्यक शारीरिक चाचणी, लेखी परीक्षेची तयारी, व्यक्तिमत्व विकास, मुलाखत मार्गदर्शन व तज्ज्ञांचे प्रशिक्षण एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे   या संधीचा जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महावि‌द्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी केले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे