आरोग्य व शिक्षण

“शिक्षण हक्क योजनेची प्रत्येक शाळेत मोफत नोंदणी करावी” – अँड नितीन पोळ

शासनाच्या (RTE ) योजने अंतर्गत शिक्षण हक्क योजना सन 2022 -23 ची अर्ज भरण्याची सुरुवात झाली असून प्रत्येक शिक्षण संस्थे मार्फत या योजनेतून मोफत नोंदणी करावी अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे आपल्या प्रसिद्धी पत्रकात पोळ पुढे म्हणाले की
शिक्षण हक्क कायद्याच्या  तरतुदी नुसार (RTE) प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे.
*RTE अर्थात शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९* या कायद्या अंतर्गत पहिली ते आठवी पर्यत च्या मुलांना खाजगी English Medium व सेमी English माध्यमाच्या शाळेत मोफत शिक्षण मिळवून देते.
*RTE याविषयी थोडक्यात*
RTE मध्ये साधारण 4 गटांना मोफत प्रवेश दिला जातो त्याचे वर्गीकरण खालील प्रमाणे:
१)सामाजिक मागास ( यामध्ये SC/ST/OBC/NT/VJNT इतर मागास प्रवर्ग)
२)आर्थिक मागास (यामध्ये ज्यांचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा कमी आहे असे सर्व जाती धर्मातील पालक)
३)अनाथ बालक(जी मुले अनाथ आहेत जी अनाथ आश्रमात राहतात किंवा ज्यांना दत्तक घेतले आहे)
४)दिव्यांग अथवा एड्सबाधित( ज्या मुलांना 40 टक्के अपंगत्व आहे असे अथवा जे एड्स बाधित आहेत असे विद्यार्थी)
*या योजनेत नाव नोंदणी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे*
१)पाल्याचा जन्माचा दाखला
२)सामाजिक मागास असलेल्या साठी पाल्याच्या वडिलांचा जातीचा दाखला
३)आर्थिक मागास असलेल्या साठी पाल्याचा वडिलांचा 1 लाखाच्या आतील उत्पनाचा दाखला.
४)रहिवाशी पुरावा आधार कार्ड,लाईट बिल,(यापैकी कोणतेही एक)ही नसेल तर रजिस्टर्ड रेंट ऍग्रिमेंट
प्राथमिक शिक्षण संचलनालय यांचे निर्देशानुसार सन २०२२-२३ या शैक्षणिक सत्रात शाळा प्रवेशासाठी RTE अर्जासाठी बालकांचा वयोगट पुढीलप्रमाणे:
– *इयत्ता १ली साठी- ०१/१०/२०१५ ते ३१/१२/२०१६ यामधे जन्मलेली बालके*
– *सिनिअर केजी साठी- ०१/१०/२०१६ ते ३१/१२/२०१७ यामधे जन्मलेली बालके*
– *ज्युनिअर केजी साठी – ०१/१०/२०१७ ते ३१/१२/२०१८ यामधे जन्मलेली बालके*
– *play group/ नर्सरी साठी -०१/०७/२०१८ ते १५/०१/२०२० या मध्ये जन्मलेली बालके**
जर तुमचा पाल्य वरील ४ पैकी वर्गीकरण केलेल्या कोणत्याही एका गटात येत असेल,तसेच प्राथमिक शिक्षण संचलनालय यांचे निर्देशानुसार वरील दिलेल्या वयोगटात बसत असेल व तुम्हाला RTE अंतर्गत खासगी शाळेत मोफत प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्हाला RTE बाबत सर्व माहिती व अर्ज भरणे आवश्यक आहेत  अनु. जाती तील पात्र बालकाचा मोफत अर्ज भरणा करणे आवश्यक असते मात्र या बाबतची माहिती पालकांना होत नाही त्यामुळे पालकांच्या शैक्षणिक प्रवेशाच्या वेळी अव्वा च्या सव्वा फी भरावी लागते मात्र खाजगी  शैक्षणिक संस्था या बाबतची माहिती देत नाही *Rte 25 % ऑनलाईन प्रवेश सन 2022-23 साठी पालकांनी ऑनलाईन अर्ज  दिनांक   17/02/2022 दुपारी 3 नंतर अर्ज भरणे सुरू झाले आहेत त्यामुळे प्रत्येक शैक्षणिक संस्थेत RTE प्रवेशाचे फॉर्म भरून घेण्याचे आदेश द्यावेत त्यामुळे अनेक गोरगरीब विध्यार्थ्याना या योजनेचा लाभ मिळेल असे या पत्रकात म्हटले आहे
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे