ब्रेकिंग

अंजनाबाई निरगुडे यांचे निधन

अंजनाबाई निरगुडे यांचे निधन

कोपरगाव :-कोपरगांव तालुक्यातील संवत्सर येथील श्रीमती अंजनाबाई रुंजाबा निरगुडे यांचे गुरुवारी ( दि. १९ डिसेंबर ) २०२४ रोजी वृध्दापकाळाने निधन झाले. मृत्युसमयी त्या ८३ वर्षाच्या होत्या. संवत्सर येथील गोदावरी काठावर त्यांच्यावर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी परिसरातून मोठा जनसमुदाय उपस्थित होता

जाहिरात
जाहिरात

कै. श्रीमती अंजनाबाई यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन एक यशस्वी गृहिणी म्हणून नांवलौकीक मिळविला. मनमिळावू व धार्मिक स्वभावामुळे त्यांनी समाजात आदराचे स्थान मिळविले होते. त्यांच्यामागे सोमनाथ, रमेश, अरुण व बाळासाहेब ही चार मुले व दोन मुली, सुना, नातू, पणतू असा मोठा परिवार आहे. संवत्सर येथे गोदावरी काठावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलेत. यांच्या निधनामुळे संवत्सर परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील यांनी निरगुडे कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

जाहिरात

सत्य एक्सप्रेस न्युजच्या व्हाँटसाँप ग्रुपवर सहभागी होण्यासाठी खालील लिंक दाबा

https://chat.whatsapp.com/JDIn3cUoYZr2hiqqupN7RB



संपादक रवींद्र जगताप
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे