ब्रेकिंग

अहिल्यानगर नामांतराची प्रभावी अंमलबजावणी न झाल्यास प्रशासनाला जाग आणण्यासाठी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना निवेदन देणार-सचिन कोळपे

अहिल्यानगर नामांतराची प्रभावी अंमलबजावणी न झाल्यास प्रशासनाला जाग आणण्यासाठी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना निवेदन देणार-सचिन कोळपे

अहिल्यानगर नामांतराची प्रभावी अंमलबजावणी न झाल्यास प्रशासनाला जाग आणण्यासाठी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना निवेदन देणार असल्याचे प्रतिपादन महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच महाराष्ट्र राज्य, मुंबई चे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष सचिन मिरानामदेव कोळपे यांनी केले आहे.महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान असणाऱ्या चोंडी येथे 31 मे 2023 रोजी आपल्या जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर करण्याच्या ऐतिहासिक निर्णयाची घोषणा केली होती.त्यानंतर शासनाने या संदर्भातील शासन आदेश देखील काढला होता मात्र 3 वर्षे होऊन गेले तरी आपल्या जिल्ह्यामध्ये शासनस्तरावर अहिल्यानगर नामांतराची अंमलबजावणी झालेली दिसून येत नाही.

ही अंमलबजावणी प्रभावीपणे होण्यासाठी मा.जिल्हाधिकारी साहेब,सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद तसेच सर्वच शासकीय विभागांना लोकप्रतिनिधी मार्फत आदेश होणे आवश्यक आहे.तसेच संबंधित अंमलबजावणी साठी आवश्यक तेथे शासनाला निधी देखील देण्याची तयारी दाखवावी लागणार आहे.कागदपत्रांमधील बदलांना लागणारा वेळ आपण समजु शकतो पण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने एकाही जुन्या फलकावर नाव बदललेले दिसत नाही, ग्रामपंचायती , जिल्हा परिषद शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र यावर देखील जुनाच उल्लेख आहे.सर्वात मोठी शोकांतिका अशी आहे लोकप्रतिनिधींनी वास्तव्यास असलेल्या गावांमधील शासकीय संसाधनांच्या नावात बदल केलेला नाही.आपल्या अहिल्यानगर च्या जडणघडणीत पतसंस्था तसेच विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांचे मोठे योगदान राहिले आहे त्यांनी देखील नामानतरासाठी पुढे आले पाहिजे.या बाबतीत योग्य त्या उपाययोजना दिसत नसल्याने महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच महाराष्ट्र राज्य, मुंबई च्या माध्यमातून जिल्हाभर या बाबतीत जागृती निर्माण केली जाणार आहे.या बाबतीत सर्व लोकप्रतिनिधी, अधिकारी, पदाधिकारी यांनी नामांतर अंमलबजावणी साठी पुढाकार घ्यावा हे आवाहन कोळपे यांनी केले आहे

लाडक्या बहिणींसाठी रक्षाबंधनाची भेट; ई-केवायसी तातडीने सुरू करण्याची मागणी
कोपरगाव : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची रखडलेली ई-केवायसी प्रक्रिया तातडीने सुरू करून राज्यातील लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची विशेष भेट द्यावी, अशी मागणी देशभक्ती सेवा मंचचे संस्थापक अध्यक्ष तथा पत्रकार रवींद्र जगताप यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना ई-मेलद्वारे निवेदन पाठवून ही मागणी केली आहे.राज्यातील लाखो महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत. शासनाच्या विविध नियमांनुसार लाभार्थी महिलांची ई-केवायसी प्रक्रिया महत्त्वाची असून, अनेक महिलांना अद्याप ई-केवायसीबाबत अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे ई-केवायसीची प्रक्रिया सुरळीतपणे सुरू करून पात्र महिलांना योजनेचा लाभ वेळेत मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे.रक्षाबंधन हा बहिण-भावाच्या प्रेमाचा आणि विश्वासाचा सण आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट म्हणून योजनेची ई-केवायसी प्रक्रिया तातडीने सुरू करावी आणि पात्र लाभार्थी महिलांना आर्थिक मदत वेळेत उपलब्ध करून द्यावी, असे जगताप यांनी निवेदनात म्हटले आहे.ई-केवायसीसाठी पोर्टलवर तांत्रिक अडचणी असल्यास त्या तातडीने दूर कराव्यात, तसेच ग्रामीण भागातील महिलांना ई-केवायसी करताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशीही मागणी करण्यात आली आहे.“रक्षाबंधनाच्या पवित्र सणानिमित्त राज्यातील लाडक्या बहिणींना शासनाकडून प्रत्यक्ष आर्थिक दिलासा मिळावा. त्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया तातडीने सुरू करून पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळवून द्यावा,” अशी अपेक्षा पत्रकार रवींद्र जगताप यांनी व्यक्त केली आहे.मुख्यमंत्री या मागणीची दखल घेऊन लाडक्या बहिणींच्या हिताचा सकारात्मक निर्णय घेतील, अशी अपेक्षा देशभक्ती सेवा मंचच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.

संपादक रवींद्र जगताप

सत्य एक्सप्रेस न्युजच्या व्हाँटसाँप ग्रुपवर सहभागी होण्यासाठी खालिल लिंक दाबा

https://chat.whatsapp.com/JcX8YoNk9gs6W6YGtE20ZI?s=cl&p=a&ilr=0&amv=2

बातम्यासाठी 9175751349 हा नंबर आपल्या व्हाटसाँप ग्रुपला अँड करा

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे