महाराष्ट्र

सामाजिक विकासामध्ये सामाजिक संघटनांचा सहभाग महत्त्वाचा!!-रमेशगिरिजी महाराज

सामाजिक विकासामध्ये सामाजिक संघटनांचा सहभाग महत्त्वाचा!!-रमेशगिरिजी महाराज

कोपरगाव प्रतिनिधी :-सामाजिक व सर्वांगीण विकासामध्ये सामाजिक संघटना या महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात याचेच उत्तम उदाहरण म्हणजे शिवसुत्र युवा प्रतिष्ठान होय असे गौरवोद्गार राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज आश्रमाचे मठाधिपती प.पू.रमेशगिरीजी महाराज यांनी केले. जेऊर कुंभारी येथील शिवसूत्र युवा प्रतिष्ठानच्या वतीने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार कमानीचे लोकार्पणप्रसंगी महाराज बोलत होते. ते पुढे म्हणाले की छत्रपती शिवरायांच्या नावाने आणि त्यांच्या कार्यपद्धतीला आदर्श मानून स्थापन केलेल्या शिवसूत्र युवा प्रतिष्ठानचा आजवरचा सामाजिक हा खरोखर कौतुकास्पद आहे. संघटनेने आजवर विविध सामाजिक उपक्रमातून लोकहिताची कामे केलेली असून आज संघटनेच्या वतीने छत्रपती शिवरायांच्या नावाने गावासाठी प्रवेशद्वार कमान उभारण्यात आली ही मोठी अभिमानाची बाब आहे. तर भविष्यात देखील संघटनेच्या माध्यमातून असेच लोककल्याणकारी सामाजिक उपक्रम राबवण्यात यावे अशी इच्छा व्यक्त करताना अशा सामाजिक संघटनांच्या पाठीशी सर्व नागरिकांनी पूर्ण ताकतीने उभे राहिले पाहिजे असे मत व्यक्त केले. दरम्यान या प्रवेशद्वार कमानीच्या उद्घाटन प्रसंगी फटाक्यांची आतषबाजी प्रेक्षणीय ठरली तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने परिसर दणाणून गेला होता सदर प्रसंगी गावातील नागरिक संघटनेचे सभासद पदाधिकारी व सर्व युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

 



संपादक:- रवींद्र जगताप
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे