भोजडे ग्रामस्थांचे हिंदू-मुस्लीम ऐक्याचे दर्शन कौतुकास्पद -आ. आशुतोष काळे
भोजडे येथे सौदागर एकता वेलफेअर सोसायटी संचलित व सौदागर काकर बिरादरी आयोजित सामुदायिक विवाह सोहळ्या प्रसंगी आ. आशुतोष काळे.
भोजडे ग्रामस्थांचे हिंदू-मुस्लीम ऐक्याचे दर्शन कौतुकास्पद -आ. आशुतोष काळे
संपादक:- रविंद्र जगताप
कोपरगाव :- कोणत्याही समाजाच्या विवाह सोहळ्यात होणारा अनावश्यक खर्च टाळणे अत्यंत गरजेचे आहे. मागील अकरा वर्षापासून भोजडेच्या मुस्लीम समाजाने विवाह सोहळ्यातील अनावश्यक खर्च टाळण्यासाठी मागील अकरा वर्षापासून राबवीत असलेला सामुदायिक विवाह सोहळयाचा उपक्रम व या उपक्रमाला भोजडेच्या ग्रामस्थांचे मिळत असलेले सहकार्य यातून घडणारे हिंदू-मुस्लीम ऐक्याचे दर्शन कौतुकास्पद असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.

भोजडे येथे सौदागर एकता वेलफेअर सोसायटी संचलित सौदागर काकर बिरादरी याच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सामुदायिक विवाह सोहळ्या प्रसंगी आ. आशुतोष काळे यांनी उपस्थित राहून नवदाम्पत्यांना शुभेच्छा दिल्या याप्रसंगी ते बोलत होते. प्रत्येक समाजाने असे सामुदायिक विवाहाचे कार्यक्रम करणे गरजेचे असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक खर्च वाचतो. सौदागर एकता वेलफेअर सोसायटीच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळ्यासारखा स्तुत्य उपक्रम राबवल्याबद्दल आ. आशुतोष काळे यांनी सोसायटीच्या सर्वच सदस्यांचे कौतुक केले.यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुधाकर रोहोम, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर, गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे संचालक विक्रम सिनगर, सरपंच सुधाकर वादे,वाल्मिक सिनगर, अजित सिनगर, विजय साबळे, भाऊसाहेब सिनगर, दादासाहेब नाईकवाडे, दिलीप सिनगर, बाळासाहेब सिनगर, संतोष सिनगर, बाळासाहेब मंचरे,सलीम शेख, सलीम सौदागर, बाबभाई शेख, शयरु शेख, बदरु शेख, महेबूब शेख,जावेद शेख, सिकंदर शेख, सदरु शेख,गुलाब शेख, बदरुशाबुद्दीन शेख, सांडूभाई शेख, मोसीन सय्यद, लब्बैक ग्रुपचे सदस्य आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते



