धार्मिकसामाजिक

साईगाव पालखी सोहळ्याचे निमित्ताने जेष्ठ नागरिक सेवा मंच, जेष्ठ महिला समितीच्या वतीने शारदा संगीत विद्यालयाच्या वतीने पहाट पाडवा  भक्तीगीताचा समारंभ संपन्न 

 

 

साईगाव पालखी सोहळ्याचे निमित्ताने जेष्ठ नागरिक सेवा मंच, जेष्ठ महिला समितीच्या वतीने शारदा संगीत विद्यालयाच्या वतीने पहाट पाडवा  भक्तीगीताचा समारंभ संपन्न 

संपादक :- रविंद्र जगताप

कोपरगाव – साईगाव पालखी सोहळ्याचे निमित्ताने जेष्ठ नागरिक सेवा मंच, जेष्ठ महिला समितीच्या वतीने शारदा संगीत विद्यालयाच्या वतीने पहाट पाडवा हा भक्तीगीताचा समारंभ संपन्न झाला.संगीत विद्यालयाच्या आबालवृद्धांनी अनेकविध प्रकारच्या गितांची मेजवानी देछन नवीन वर्षाचे स्वागत केले. सर्वच गितांना उपस्थितांनी टाळ्या वाजवून दाद दिली.
जेष्ठ नागरिक सेवा मंचच्या अध्यक्षा सौ सुधा भाभी ठोळे, कैलासशेठ ठोळे, विजय बंब, उत्तम भाई शहा, डॉ विलास आचार्य, साई सेवा भक्त मंडळाच्या जेष्ठ महिला भगिनी, ( आर टी ओ ऑफिसर ) आदींच्या हस्ते ( ब्रम्हधवज ) गुढीचे पुजन करून गुढी उभारण्यात आली. संगीत विद्यालयाच्या संचालीका, केतन कुलकर्णी, सुरभी कुलकर्णी आदींचा मंचच्या वतीने सत्कार करण्यात आला.

पहाट पाडवा समारंभासाठी प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ पुष्पाताई काळे, जेष्ठ नागरिक सेवा मंचचे उपाध्यक्ष दत्तोपंत कंगले, लेखा परीक्षक नितीन डोंगरे, माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे, शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.पहाट पाडवा संपन्न झालेवर महिलांची दुचाकी शहर फेरी संपन्न झाली. या निमित्ताने सर्व शहरात प्रसन्न, भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.श्री साईगांव पालखी सोहळ्यानिमित्त मुंबादेवी तरूण मंडळ, जेष्ठ नागरिक सेवा मंच, जेष्ठ महिला समिती, कोपरगाव शहर डॉक्टर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत सर्वरोग निदान शिबिराचे उद्घाटन प्रसंगी डॉ डी एस मुळे, डॉ नाईकवाडे, डॉ प्रियंका मुळे, डॉ भांडगे, डॉ विलास आचारी, मंचच्या अध्यक्षा सौ सुधा भाभी ठोळे, महिला समितीच्या अध्यक्षा रजनीताई गुजराथी, डॉ सौ नाईकवाडे ( नेत्ररोग तज्ञ ) पेंटर दारुवाला, उत्तम भाई शहा, वसंत तात्या आव्हाड आदी मान्यवर उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे