कोपरगावला अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय व्हावे :- किशोर चोरगे
कोपरगावला अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय व्हावे अस्या मागणीचे निवेदन जयहिंद विचार मंच संस्थापक अध्यक्ष किशोर चोरगे यांनी इमेल ने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जिल्हाधिकारी अहमदनगर पाठवले आहे निवेदनात पुढे म्हंटले आहे कि कोपरगावला अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय व्हावे महाराष्ट्र राज्यात अहमदनगर जिल्हा हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आहे. अहमदनगर जिल्हा विभाजनाचा प्रस्ताव १९८०-८१ पासून शासनाच्या विचाराधीन असून अकोले, संगमनेर, राहाता, कोपरगांव, श्रीरामपूर, नेवासा व राहुरी या तालुक्यासाठी स्वतंत्र जिल्हा मुख्यालय कोपरगाव योग्य असून अंदाजे तशी शिफारस मंत्रिमंडळाने नेमलेल्या समितीनेही अहवालात केली आहे. कोपरगावला विमानतळ रेल्वे स्टेशन भव्य असं बसस्टॉप अशी सर्वात महत्वाची दळण वळणाची साधणे कोपरगावात आहे शिर्डी सारख जागतिक दर्जाचं अध्यात्मिक स्थळ कोपरगाव पासुन १५कि.मी अंतरावर आहे कोपरगाव महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या गोदावरी नदी किनारी वसले आहे भौगोलिकदृष्ट्या नैसर्गिकरीत्या कोपरगाव प्रस्तावित अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय साठी अगदी सक्षम आहे तसेच दोन शासकिय इमारतीत भव्य स्वरूपाच्या कोपरगावात कार्यान्वित असुन शासनाला नविन अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय बांधायची गरज नाही तहसिल कार्यालयावरील दोन मजले आज रिक्त आहे तिथं हि अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय होऊ शकते आणि अंदाजे शासनाच्या नियोजनात कोपरगांव जिल्हा नियोजित असुन कोपरगाव मध्ये अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय कोपरगाव येथेच व्हावे कोपरगाव शहराच्या विकास आराखड्यात भविष्यातील कोपरगाव जिल्हा मुख्यालय डोळ्यासमोर ठेवून रचना व जागांचे आरक्षण करण्यात येण्या करता शासकिय जागा हि मुबलक आहे व निवास स्थानासाठी ७.७७ हेक्टर जमीन आरक्षित करता येऊ शकते भविष्यात कोपरगाव जिल्हा मुख्यालय झाल्यास सरकारी कार्यालये व कर्मचारी निवासस्थानासाठी इमारती बांधण्यास ऐनवेळी जागेची शोधाशोध करावी लागणार नाही कोपरगाव हि आधीच व्यवस्था पासून शासन प्रस्तावात केली आहे.तसेच अहमदनगर जिल्हा विभाजना करता अनेक जिल्हे प्रस्तावित आहे जर नाशिक व अहमदनगर जिल्हा हा संयुक्त विभाजन केले तर तीन जिल्ह्यांचा अतिरीक्त ताण कमी होऊ अहमदनगर नाशिक जिल्हा विभाजनात नाशिकचे दोन शहर कोपरगांवला जोडले सिन्नर आणि येवला व छ.संभाजी नगर चे एक शहर वैजापुर कोपरगावला जोडले जसे राहता येवला सिन्नर वैजापूर राहुरी अकोले श्रीरामपुर संगमनेर नेवासा तर असा मध्यवर्ती कोपरगाव जिल्हा होऊ शकतो व कोपरगाव जिल्ह्याला तीन विभागीय जिल्ह्यांच्या सीमा आहे या कोपरगाव जिल्हा कृती समितीच्या मागणीवर राष्ट्रपती पंतप्रधान मुख्यमंत्री यांचे सकारात्मक सुतोवासाचे दखल पत्र हि कोपरगाव जिल्हा कृती समितीला आले आहे
म्हणुन कोपरगावला अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय करावे जिल्हा मुख्यालय करता शासनाला हे कार्यालय उपयुक्त ठरेल आणि सोयीचे ठरेल असे निवेदनात म्हंटले असुन कोपरगावला अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय व्हावे अशी विनंती पर मागणी किशोर चोरगे
संस्थापक अध्यक्ष जयहिंद विचार मंच दिलीप घुमरे उपाध्यक्ष यांनी केली आहे

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा