महाराष्ट्र

राज्य पत्रकार संघटनेच्या वतीने कोपरगावातील पत्रकारांची दिवाळी गोड

राज्य पत्रकार संघटनेच्या वतीने कोपरगावातील पत्रकारांची दिवाळी गोड

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेच्या वतीने प्रदेश सरचिटणीस डॉ विश्वासराव आरोटे यांच्या संकल्पनेतून व शुभहस्ते कोपरगावातील पत्रकारांना दिवाळीनिमित्त मिठाई व भेटवस्तूचे वाटप करत राज्य पत्रकार संघटनेच्या वतीने दिवाळी गोड करण्यात आली तसेच या प्रसंगी संघटनेच्या वतीने नुकत्याच संपन्न झालेल्या पत्रकार संवाद यात्रेच्या पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले.

जाहिरात

या प्रसंगी संघटनेचे सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांनी सर्व पत्रकारांना दिवाळीनिमित्त शुभेच्छा देत पत्रकार हा देखील एक मतदार असून सरकारने कान, नाक डोळे उघडे ठेवून पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांच्या समस्यांकडे देखील लक्ष द्यावे असे सांगितले…या प्रसंगी संघटनेचे कोपरगाव तालुकाध्यक्ष जनार्दन जगताप, संगमनेर तालुकाध्यक्ष संजय गोपाळे, कोपरगाव शहराध्यक्ष हफिज शेख, कार्याध्यक्ष बिपिन गायकवाड, उपाध्यक्ष स्वप्नील कोपरे, ज्येष्ठ पत्रकार फकीरराव टेके, युसूफ रंगरेज, संतोष जाधव,सोमनाथ सोनपसारे, किसन पवार, विनोद जवरे, राहुल कोळगे, अमोल गायकवाड, सोमनाथ डफळ, राजेंद्र तासकर,रवींद्र जगताप, अक्षय काळे, काकासाहेब खर्डे, गणेश बत्तासे, मधुकर वक्ते, दीपेश डफळ आदी कोपरगाव तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते. तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार तालुका सचिव प्रा. विजय कापसे यांनी व्यक्त केले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे